छत्रपती संभाजीनगर
Trending

न्यूजपेपर वितरकास मारहाण, टीव्ही सेंटर मोना बिअरबारच्या समोर दगडाने डोके फोडले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – न्यूजपेपर वितरणावरून दगडाने मारहाण केल्याची घटना टीव्ही सेंटर परिसरात घडली. यात वितरक जखमी झाले असून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मोनाबिअरबार समोर घडली.

ऋषीकेश मोरे (रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तर आतिश नानासाहेब खंबाट (वय 39 वर्षे धंदा न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर रा. एन 11 F 12/8 नवजीवन कॉलनी छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.

खंबाट यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 26/03/2023 रोजी सकाळी 06.30 वाजेच्या सुमारास खंबाट नेहमीप्रमाणे मोना बिअरबारच्या समोर न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करत असताना ऋषीकेश मोरे (रा. जाधववाडी) हे रोजच्या प्रमाणे पेपर घेण्यासाठी त्याचे व त्याचा मित्र गणेश पवार याचे पेपर घेण्यासाठी आले.

तेव्हा खंबाट त्यांना म्हणाले की उद्यापासुन मी एकत्र पेपर देणार नाही. प्रत्येकाला वेगवेगळे पेपर देईल असे म्हणाल्यावर ऋषीकेश मोरे याने खंबाट यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर हाताचापटाने मारहाण केली व खाली पडलेला दगड उचलून डोक्यात कपाळावर मारून खंबाट यांचे डोके फोडून त्यांना जखमी केले. त्यानंतर तो तेथून पळुन गेला. नंतर खंबाट मित्रांसोबत पोलीस ठाणे सिडको येथे पोहोचले. तेथे पोलीसांनी त्यांना मेडीकल मेमो देवून उपचार कामी घाटीत पाठवले.

न्यूजपेपर वितरक आतिश नानासाहेब खंबाट यांच्या तक्रारीवरून ऋषीकेश मोरे (रा. जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!