डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: व्यवस्थापन परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक जाहीर !
अधिसभेच्या बैठकीत १३ मार्च रोजी मतदान २५ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

संभाजीनगर लाईव्ह, दि.२० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडूण येणा-या या जागांसाठी येत्या १३ मार्च रोजी होणा-या बैठकीत मतदान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुका नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडल्या. आता दुस-या टप्प्यात व्यवस्थापन परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये चार जागा खुल्या तर चार राखीव असणार आहेत.
प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक व पदवीधर गटातून प्रत्येकी एक जागा खुल्या गटातील असून अनुक्रमे अनुसूचित जाती (एस.सी), इतर मागास वर्ग (ओबीसी), अनुसूचित जमाती (एस.टी), भटके विमुक्त जाती-जमाती (व्ही.जे.एन.टी) या प्रमाणे सदस्य निवडूण येणार आहेत. या निवडणुकीसाठी २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान कार्यालयीन वेळीत अर्ज दाखल करता येतील.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
२६ रोजी छाननी तर ६ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होणार आहे. अधिसभेची बैठक १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार असून या निवडणुकीत मतदान होईल. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, कक्षाधिकारी अर्जुन खांड्रे, सहायक संजय लांब निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. दरत्यान, या निवडणुकीसाठी एकुण ७६ मतदार असून यातील ६ जागा रिक्त आहेत.