छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवशी कडकडीत बंद, बेमुदत संपाची धार वाढली !

मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही : डॉ.पाथ्रीकर

संभाजीनगर लाईव्ह दि.२० : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना झुलवत ठेण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून पासून अधिक तिव्रतेने बेमुदत संप करण्यात आला आहे, अशी माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली. पहिल्या दिवशी कडकडीत बंद राहिला

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४२ हून अधिक विभागातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोजन लागू केला. मात्र १३ विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागूणक दिली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुरुवारी (दि.१६) विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप केला. आता २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनात पुढील मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, पहिल्या दिवशी ‘बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेचे नेते तथा अधिसभा सदस्य डॉ.विक्रम खिल्लारे यांनी कर्मचारी यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच सहसंचालक डॉ.सुरेंद्र ठाकूर यांनी राज्य शासन आपल्या मागण्या बाबत सकारात्मक असून संप मागे घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या एकाही मागणीवर ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला आहे.

या प्रमुख मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून हा संप आणखी तीव्र करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष  डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!