छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोमवारपासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु होणार !

नवीन शैक्षणिकसत्र वेळेत सुरू करण्याची नियोजन

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (दि.पाच) ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहे. विद्यापीठ मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी १५ जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. आय आर मंझा यांच्या सह कवी समितीचे २२ सदस्य ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक होऊन बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. यानुसार ५ ते १५ जून दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. २० जानेवारी रोजी प्राथमिक यादी तर २८ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. ४ व ६ जुलै रोजी समुपदेशन करून अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १७ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रम : एम.ए.- मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली व बुध्दीझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भुगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्कालॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, बी.पी.ए, आजीवन शिक्षण व विस्तार

एम.एस्सी – पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान,
एम.टेक रसायन अभियांत्रिकी, बी.टेक रसायन तंत्रज्ञान
बी.होक/ एम.व्होक – इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, ऑटोमोबाइ्ल तंत्रज्ञान
एम.बी.ए., एम.सी.ए, एम.टी.एम, मुद्रण तंत्रज्ञान,

एलएलएम, एम.कॉम, एम.आय.बी, डी.बी.एम, एम.एफ, ए, एम.ए. (एम.सी.जे), एम.एड.एमपीएड, एम.लिब आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच मुख्य परिसरात सामाजिक कार्य महाविद्यालय एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद उपपरिसर – एम.एस्सी – सुक्ष्म जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणित, जल व भूमी व्यवस्थापन, एम.बी.ए, एम.ए.इंग्रजी, एम.पी.ए व एम.एड आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.

सत्र वेळेवर सुरू करण्याचे नियोजन : कुलगुरू

नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यंदापासून होत आहे . पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलांच्या तासिका अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १५ जूनपासून सुरू होतील. तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्ग १७ जुलैपासून सुरू होणार आहेत. बीए, बी एससी व बी कॉम या परंपरागत अभ्यासक्रमाचे निकाल येत्या दोन दिवसात घोषित होणार आहेत. पुढील संपूर्ण शैक्षणिक वर्षात अध्यापन, परीक्षा व निकाल हे सर्व वेळेत व्हावे यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नरत असल्याची प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!