महाराष्ट्र
Trending

समृध्दी महामार्गावर १०० दिवसांत ९०० अपघात, महामार्गाच्या कामात १२३८ कोटींचा घोटाळा !

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवारांनी सरकारच्या कारभाराचे काढले वाभाडे

मुंबई, दि. २४ – हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर शंभर दिवसात नऊशे अपघात झाले आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अपघाताला कारणीभूत असणाऱ्या घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा यासह या महामार्गात १२३८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत याची तातडीने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवारांनी सरकारच्या कारभाराचे काढले वाभाडे. या समृध्दी महामार्गाच्या कामात १२३८ कोटींचा गौण खनिज रॉयल्टी घोटाळा झाला आहे. हजारो कोटी रुपयांचा फार मोठा घोटाळा आहे. राज्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. समृध्दी महामार्गातून सरकार जनतेची समृध्दी साधत आहे की.. कंत्राटदाराची. या आर्थिक घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यावरही लक्ष वेधले. अतिशय कमी कालावधीत खूप लोकांचा बळी या रस्त्यावर गेल्याने पवारांनी चिंता व्यक्त केली. शंभर दिवसात नऊशे अपघात झाले आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अपघाताला कारणीभूत असणाऱ्या घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा, अशी मागणीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!