डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी टाईट फिल्डिंग ! कुलगुरु येवलेंनी नेमली समिती, ऑनलाईन पध्दतींवर २२ तज्ञांचा वॉच !!
पदव्यूत्तर प्रवेशासाठी

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुव्यवस्थितपणे राबविण्यासाठी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी २२ सदस्यीय समिती गठित केली आहे.
मुख्य परिसरातील सर्व पदव्युत्तर विभाग, उस्मानाबाद उपपरिसर, मॉडेल कॉलेज धनसावंगी तसेच समाजकार्य महाविद्यालय येथील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. या नियोजनासाठी कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २२ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
समितीत परीक्षा मंडळ संचालक डॉ.भारती गवळी, उपपरिसर संचालक डॉ.दत्तात्रय गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी असून पदव्यूत्तर विीाागोचे उपकुलसचिव डॉ.ईश्वर मंझा आदीचा समावेश आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन व वेळापत्रक या विषयी शुक्रवारी दि.२८ दुपारी ३ वाजता व्यवस्थापन परिषद कक्षात बैठक होणार आहे.
प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख यांच्यासह अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी यांचे मार्गदर्शन समितीला मिळेल.