छत्रपती संभाजीनगर
Trending

पदव्युत्तर प्रवेशासाठी चार हजार ३८३ विद्यार्थ्यांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठी या तारखेपर्यंत मुदत !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या ऑनलाईन नोंदणीस यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आदित्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण ४ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठी ३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ५ ते २६ जुन दरम्यान ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. विद्यापीठ मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यात आली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील सर्व ४५ विभाग तसेच धाराशिव उपपरिसर येथील सर्व १० विभागांत ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. आय आर मंझा, युनिकचे संचालक डॉ. प्रवीण यन्नावार यांच्यासह प्रवेश समितीचे २२ सदस्य, पदव्युत्तर विभागातील कर्मचारी ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यानूसार ५ ते २६ जून दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. १ जुलै रोजी रोजी प्राथमिक यादी घोषित करण्यात आली. तर ८ जुलै रोजी गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. १५ व १७ जुलै रोजी अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रम : एम.ए.- मराठी, हिंदी, ऊर्दु, पाली व बुध्दीझम, संस्कृत, स्त्री अभ्यास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, भुगोल, विदेशी भाषा, मानसशास्त्र, अर्कालॉजी, फुले-आंबेडकर विचारधारा, योगशास्त्र, संगीत, बी.पी.ए, आजीवन शिक्षण व विस्तार एम.एस्सी – पदार्थविज्ञान, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रानिक्स, रसायनशास्त्र, जीव रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, एम.टेक रसायन अभियांत्रिकी, बी.टेक रसायन तंत्रज्ञान बी.होक/ एम.व्होक – इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, ऑटोमोबाइ्ल तंत्रज्ञान एम.बी.ए., एम.सी.ए, एम.टी.एम, मुद्रण तंत्रज्ञान, एलएलएम, एम.कॉम, एम.आय.बी, डी.बी.एम, एम.एफ, ए, एम.ए. (एम.सी.जे), एम.एड.एमपीएड, एम.लिब आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच मुख्य परिसरात सामाजिक कार्य महाविद्यालय एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत.

धाराशिव उपपरिसर – एम.एस्सी – सुक्ष्म जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, गणित, जल व भूमी व्यवस्थापन, एम.बी.ए, एम.ए.इंग्रजी, एम.पी.ए व एम.एड आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन : कुलगुरू
नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यंदापासून होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या मुलांच्या तासिका अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे सुरू झाल्या आहेत. तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्ग १४ जुलैपासून सुरू होणार आहेत. बीए, बी एससी व बी कॉम या परंपरागत अभ्यासक्रमाचे निकाल यंदा वेळवेर दिवसात घोषित झाले आहेत. पुढील संपूर्ण शैक्षणिक वर्षात अध्यापन, परीक्षा व निकाल हे सर्व वेळेत व्हावे यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नरत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!