डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: दोन आठवड्यांत २८ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग !
'पदव्युत्तर'च्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन मुल्यांकन

संभाजीनगर लाईव्ह, दि.३०: पदव्यूत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन ’ऑनलाईन पध्दतीने सुरू असून दोन आठवड्यांत २८ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनात ’डिजीटल व्हॅल्यूवेशन सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन १८ जानेवारी रोजी करण्यात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी व औषधीनिर्माणशास्त्र यासह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांना १७ जानेवारी रोजी सुरुवात झाली.
या सर्व परीक्षांचे पेपर हे ऑनलाईन पध्दतीने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवनात ’डिजीटल व्हॅल्यूवेशन सेंटर’ सुरु करण्यात आले. या केंद्रात १५ संगणकावर ३ हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिग दररोज होत आहे. आजपर्यंत पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १०५ कोर्सच्या २८ हजार ८८७ उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रमासाठी एकूण हजार विद्यार्थी बसलेले असून ६५ हजार उत्तर पत्रिकांची मूल्यांकन या पद्धतीने होणार आहे . इथे १५ दिवसांत सर्व निकाल लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. गणेश मंझा यांनी दिली .
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे केंद्र सुरु करण्यात आले . या प्रक्रियेमुळे निकालात अधिक पारदर्शकता, गतीमानता व सुसूत्रता येईल, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केली.