छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना पत्रकारितेतील पीएच.डी !

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या संदर्भात अभ्यास

संभाजीनगर लाईव्ह, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय गोविंदराव शिंदे यांना ’वृत्तपत्र विद्या व जनसंवाद’ या विषयात पीएच.डी प्राप्त झाली आले.

माजी विभागप्रमुख डॉ.वि.ल.धारुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ’राजकीय जनसंपर्कात संकेतस्थळांचा वापर : महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या संदर्भात अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला. २०१४ व २०१९ या दोन सार्वजिक निवडणुक व विधानसभा निवडणुक दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी जनसंपर्कासाठी संकेतस्थळांचा केलेल्या वापर यावर संशोधन करण्यात आले.

पीएच.डी प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ.दिनकर माने, कर्मचारी संघटनेचे नेते डॉ.वैâलास पाथ्रीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!