महाराष्ट्र

तलाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहात चतुर्भुज ! सातबारावरील अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करण्यसाठी बदनापूर तहसीलच्या तलाठ्यांनी घेतली लाच !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) शेरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना बदनापूर तहसीलच्या तलाठी यांना रंगेहात पकडण्यात आले.

रेखा पुरुषोत्तम मानेकर (वय 32 वर्षे, पद – तलाठी, वर्ग – 3, सज्जा – निकलक. तहसील कार्यालय, बदनापूर जि. जालना रा. समर्थनगर, जुना जालना) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी स्वत:च्या नावाने आरोपी यांचेकडे सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता.

परंतु आरोपी यांनी काम केले नाही. म्हणून तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज केला. परंतु आरोपी यांनी तरी सुद्धा काम न करता तक्रारदार यांना 2000 रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्यूरो जालना येथे तक्रार दिली. सदर लाच पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2,000 रुपये लाचेची मागणी करून 2000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

आज दि. 31.08.2023 रोजी सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी यांनी पंचासमक्ष 2000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. आरोपी यांचेकडून 2,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे बदनापूर (ता.बदनापूर जि. जालना) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा पथक – गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!