छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

रेल्वे स्टेशन हमालवाडी येथील आठ दुकानांच्या अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने डीपी रोड केला मोकळा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.२३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत रेल्वेस्टेशन हमालवाडी येथील अनधिकृत ८ दुकानांचे बांधकाम जमीनदोस्त व ०७ लोखंडी टपऱ्या काढून टाकण्यात आल्या.

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आज, २३ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्टेशन हमालवाडी येथील ०९ मीटर रस्ता बाधित एकूण ०८ अनधिकृत दुकानांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. सकाळी १०.०० वाजेपासून अतिक्रमण कारवाईस सुरूवात करण्यात आली.

उप अभियंता नगर रचना विभाग संजय कोंबडे यांनी त्यांच्या पथकासह रस्ता मार्किंग करून दिल्यानंतर या ९ मीटर डी पी रोडवरील रस्ता बाधित अनधिकृत ०८ दुकानांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. यानंतर या ठिकाणी असलेल्या अनधिकृत ०७ लोखंडी टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी व उप आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गर्शनाखाली इमारत निरीक्षक सारंग विधाते, रामेश्वर सुरासे, नागरी मित्र पथक कर्मचारी व अतिक्रमण हटाव विभाग कर्मचारी यांनी पार पाडली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!