महाराष्ट्र
Trending

बदनापूर येथील केबल ऑपरेटरच्या कंट्रोल रुमवर छापेमारी, बंदी असलेल्या पाकिस्तानच्या चॅनलचे प्रसारण ! टॅक्स वाचवण्यासाठी चॅनल कंपनी, नागरिक आणि सरकारची फसवणूक !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील जय महाराष्ट्र केबल नेटवर्कच्या कंट्रोल रुमवर पोलिसांनी छापेमारी करून इलेक्टोनिक साहित्य जप्त केले आहे. स्टार इंडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या अॅन्टी पायरसी कन्सल्टन्टने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर केबल नेटवर्कने टॅक्स वाचवण्यासाठी चॅनल कंपनी, नागरिक आणि सरकारची फसवणूक केली आहे. याशिवाय भारतात बंदी असलेल्या पाकिस्तानच्या चॅनलचे प्रसारणही या केबल नेटवर्कच्या माध्यमातून सुरु असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

मुद्दसीर बाबर मीया काझी (कुरेशी मोहल्ला, बदनापूर, ता. बदनापूर, जिल्हा जालना) असे आरोपीचे नाव आहे.  मोहम्मद बक्तीयार अब्दुल मुनाफ कुरेशी (अॅन्टी पायरसी कन्सल्टन्ट रा. मुंबई) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते स्टार इंडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनी मध्ये अॅन्टी पायरसी कन्सल्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. स्टार टीव्ही हे भारतातील मोठे प्रसारक आहे. कंपनी भारतात 50 पेक्षा जास्त पे चॅनलची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि प्रसारण करते. कंपनीकडे स्टार टेलीव्हीजन पे चॅनल टेलीव्हीजनचे पे चैनल डाऊन लिंक करण्यासाठी भारतात प्रसारणाचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून (एमआयव्ही) परवानग्या घेतलेल्या आहेत. भारतातील मल्टी सीस्टम ऑपरेटर (एमएसओ) किंवा स्थानिक केबल ऑपरेटरला स्टार टेलीव्हीजन पे चॅनल प्रसारित किंवा पुन्हः प्रसारीत करण्यासाठी करार किंवा इंटर कनेक्शन करार आवश्यक आहे.

कंपनीच्या माहितीत असे आले आहे की, मुद्दसीर बाबर मीया काझी (रा. बदनापूर) हा मेसर्स जय महाराष्ट्र केबल नेटवर्क (केबल ऑपरेटर म्हणून ओळखला जाणारा) या व्यवसाय नावाने केबल व्यवसाय करत आहे. सदर केबल ऑपरेटरने बेकायदेशीर केबल नेटवर्कचे नियंत्रण कक्ष (कुरेशी मोहल्ला, बदनापूर, ता. बदनापूर, जिल्हा जालना) येथे करत आहे. सदर केबल ऑपरेटरने बेकायदेशीर पणे स्टार चॅनलचे सग्नल स्टार कंपनीचे परवानगी शिवाय घेतले असून ते बदनापूर शहरातील ग्राहकांना बेकायदेशीर पणे विक्री करून स्टारचे चॅनेल प्रसारीत करत आहे. ज्यामुळे चोरीचा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

तसेच सदर केबल ऑपरेटर हा पाकीस्तान देशाचे ARY QTV हे टी व्ही चॅनेल बदनापूर येथे त्याच्या केबल नेटवर्क वरून बदनापूर येथे प्रसारित करत आहे. सदर पाकिस्तान चॅनल हे भारतात प्रसारण करण्यास बंदी आहे. सदर पाकिस्तान देशाचे ARY QTV हे टी व्ही चॅनल हे भारताचे MIB च्या नोंदणीकृत चॅनलच्या यादीत नाही. त्याप्रमाणे सदर पाकिस्तान देशाचे ARY QTV हे टी व्ही चॅनेल हे प्रसारीत करण्यासाठी केबल टीव्ही चॅनल नियम व सीटीएन कायदया मधील तरतुदी नुसार बेकायदेशीर आहे. तसेच सदर केबल ऑपरेटर यांचे याप्रकारे चोरून टीव्ही चॅनल त्यांच्या अर्थीक फायदयासाठी केबल चॅनलेचे प्रसारण करुन स्टार टीव्हीचे तसेच सरकारी टॅक्स वाचवून नागरिकांची आणि सरकारची फसवणूक करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, केबल ऑपरेटरच्या कंट्रोल रुममध्ये रेड करण्यासाठी पोलिस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी केबल नेटवर्क प्रसारित करणारे मुद्दसीर बाबर मीयाँ काझी (रा. कुरेशी मोहल्ला, बदनापूर) येथे त्यांच्या घरी जावून 18.45 वाजता छापा मारला. सदर व्यक्ती घरी मीळून आले. तेंव्हा पंचासमक्ष पोलिसांनी घराची झडती घेतली असता केबल ऑपरेटींग करण्यासाठी एक कंट्रोल रुम मिळून आली. पोलिस पथकाने कंट्रोल रुम चेक करून सेट टॉप बॉक्स,सीग्नल रीसीव्हर बॉक्स व अन्य साहित्य जप्त केले आहे.

याप्रकरणी स्टार इंडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या अॅन्टी पायरसी कन्सल्टन्ट मोहम्मद बक्तीयार अब्दुल मुनाफ कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जय महाराष्ट्र केबल नेटवर्कचे मुद्दसीर बाबर मीया काझी (कुरेशी मोहल्ला, बदनापूर, ता. बदनापूर, जिल्हा जालना) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!