35 ग्रामपंयातीच्या सदस्य, थेट सरपंच पदासाठी निवडणूक, कामगारांना मतदानासाठी तीन तासांची सुट्टी जाहीर !

औरंगाबाद, दिनांक 15 : राज्य निवडणूक आयोग यांनी निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील 35 ग्रामपंयातीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 18 डिसेंबर रविवार रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
सदर निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी, तीन तासाची सवलत देण्यात यावी.
सदर सुट्टी खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादीना लागु राहील, असे कामगार उप आयुक्त चं.अं. राऊत यांनी कळवले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the छत्रपती संभाजीनगर Live channel on WhatsApp:👇
https://whatsapp.com/channel/0029Va9cQwH1HspwZDjxdY29 - पुढील मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट
9923355999