छत्रपती संभाजीनगर

वाळूज एमआयडीसीतील कंपनीत कामगारांत तू-तू मैं-मैं, गेटच्या बाहेर काढल्याने HR वर चाकू हल्ला ! चार मित्र व दोन महिलांना बोलावून कंपनीत तोडफोड !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – लाईन सुपर वायझर व अन्य एकाला मारहाण करण्याची धमकी देणार्या दोघांची HRने समजूत काढली. त्यानंतरही वाद वाढतच गेल्याने त्या दोघांना गेटच्या बाहेर सोडण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ते दोघे पुन्हा परतले. सोबत चार मित्र व दोन महिलांनी गेटवर चढून आत प्रवेश केला. HRवर चाकू हल्ला करून कॅबिनची तोडफोड करण्यात आल्याची घटना  गणेश प्रेस अँण्ड कोट इंड प्रा. लि या कंपनीत घडली.

गणेश बाबसाहेब बटुळे वय 25 वर्षे, व्यवसाय एच आर रा. पवननगर राजणगाव शेपु. ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. वृषभ शेळके, राहुल यादव, बंटी शेळके यांच्यासह एक जण व दोन महिलांवर वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बटुळे हे गणेश प्रेस अँण्ड कोट इंड प्रा. लि या कंपणीमध्ये HR म्हणून नौकरी करतात. HR गणेश बटुळे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 13/12/2022 रोजी ते नेहमी प्रमाणे सकाळी 08.30 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत कंपनीत होते. काम करुन HR गणेश बटुळे घरी गेले व जेवण करून कंपनीत अर्जट काम निघाल्याने रात्री 10.00 वाजेच्या सुमारास HR गणेश बटुळे पुन्हा कंपनत गेले.

कंपनीत काम करीत असताना लाईन सुपर वायझर तनवीर दुरानी यांनी HR गणेश बटुळे यांना फोन करुन सांगितले की, वृषभ शेळके व राहुल यादव यांनी मला व संजय पठारे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर HR गणेश बटुळे यांनी सेक्युरीटी नरेश मनवर यास आत पाठवले. त्यानंतर ही त्यांचा वाद मिटला नाही. HR गणेश बटुळे यांना परत तनवीर यांचा फोन आला. त्यामुळे HR गणेश बटुळे हे आत गेले. त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.

परंतु वृषभ शेळके व राहुल यादव, बंटी शेळके हे एकेण्याच्या परिस्थीत नव्हते. त्यांनी HR गणेश बटुळे यांनाही शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर HR गणेश बटुळे यांनी त्यांचा ठेकेदार बिबन सैय्यद यास फोन करून घटनेची माहीती दिली. त्यानंतर HR गणेश बटुळे हे सेक्युरीटीसह वृषभ शेळके व राहुल यादव यांना गेटवर घेवुन गेले. तिथे त्यांची समजुत काढली व त्यांना कंपनीच्या गेट बाहेर सोडले. तेव्हा त्यांनी पाच मिनिटानी त्यांचे चार मित्र व दोन महीलांना बोलावून कंपनीच्या गेटवरुन आत प्रवेश केला.

त्यानंतर वृषभ शेळके व राहुल यादव यांनी HR गणेश बटुळे यांच्यावर चाकुने हल्ला केला. त्यामध्ये HR गणेश बटुळे यांच्या डाव्या कानाच्या वर मार लागून जखमी झाले. तसेच त्यांच्या मित्रानी उजव्या पायावर लोखंडी रॉडने माराहण केली. महीलांनी कंपनीच्या काचा फोडून कॅबीनचे नुकसान केले. त्यावेळी कंपनीचे सेक्युरीटी व तनवीर दुरानी यांनी त्यांच्या ताब्यातून HR गणेश बटुळे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळावरून ते पळून गेले.

गणेश बाबसाहेब बटुळे (वय 25 वर्षे, व्यवसाय एच आर रा. पवननगर राजणगाव शेपु. ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वृषभ शेळके, राहुल यादव, बंटी शेळके यांच्यासह एक जण व दोन महिलांवर वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!