बाबा पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री लुटले, G 20 निमित्त लाईटिंगचे काम करणाऱ्या इलेक्टिशियनला चाकूचा धाक दाखवून लुटले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – G 20 परिषदे निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईचा ठेका ज्या कंपनीला दिलेला आहे त्या कंपनीचा इलेक्ट्रिशियन आणि त्याचे सहकारी लाईटिंगच्या देखभालीचे काम करत असताना मोटारसायकलस्वार दोघांनी चाकूचा धाक दाखवून इलेक्ट्रिशियनला लुटले. ही घटना मध्यरात्री बाबा पेट्रोलपंप जवळ घडली.
अनिकेत बाळु ढावरे (वय 24वर्ष व्यवसाय इलेक्ट्रीशियन रा. मार्केट यार्ड आंबेडकर नगर गल्ली पुणे, ह मु. मध्यवर्ती बसस्थानक समोर अर्थव लाँज, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात G20 परिषदीसाठी शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी लागणार्या लाईटिंगच्या व्यवस्थेचे काम ठेकेदार युवराज शिवाजी शिंदे (रा पुणे) यांनी घेतलेले आहे. त्यांच्याकडे अनिकेत बाळु ढावरे हे इलेक्ट्रीशियन म्हणून कामाला आहेत.
दि 1/03/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपासून सिध्दार्थ गार्डन पासून इलेक्टिशीयन अनिकेत बाळु ढावरे व त्यांच्या सोबत १) मोहम्मद शाबेर मोहम्मद शमशोउद्दीन (वय 26 वर्षे) २) राजेंद्र माताप्रसाद यादव (वय 40 वर्षे दोन्ही रा पुणे) छोटा हत्तीमध्ये बसून G20 निमित्ताने शहरात रोडवर तात्पुरत्या स्वरुपाची लावलेली लाईटिंग चेक करत होते. रात्री 01.20 वाजता बाबा पेट्रोल पंपला ते आले असता तेथे एका मोटार सायकलवर दोन अनोळखींनी त्यांच्या छोटा हत्ती समोर मोटारसायकल आडवी लावली.
त्यातील एकाने इलेक्टिशीयन अनिकेत बाळु ढावरे यांना चाकुचा धाक दाखवून म्हणाला की तुम्हारे पास कितने पैसे है निकालो त्यावर आम्ही त्याला म्हणालो कशाचे पैसे. त्यावर तो म्हणाला की तेरे को मालुम नही हम कौन है असे म्हणून त्यांनी इलेक्टिशीयन अनिकेत बाळु ढावरे यांना व सोबतच्या लोकांना धमकी देवून चाकुचा धाक दाखवून बळजबरीने शर्टच्या वरच्या खिश्यातून 10500/- रुपये रोख हिसकावून मोटारसायकलने बाबा पेट्रोलपंप ते नगर नाक्याकडे पसार झाले.
याप्रकरणी इलेक्टिशीयन अनिकेत बाळु ढावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि ठुबे करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe