महानगरपालिका
Trending

हडको टीव्ही सेंटर संजय गांधी भाजी मार्केट मधील सहा दुकानांचे अतिक्रमण काढले, नाल्यावरील अतिक्रमणावरही जेसीबी फिरवणार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – हडको टीव्ही सेंटर संजय गांधी भाजी मार्केट मधील एकूण सहा दुकानांचे अतिक्रमण निष्काशीत करण्यात आले आहे.

महानगरपालिका आणि सिडको प्रशासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको हडको भागातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या अंतर्गत टीव्ही सेंटर येथील संजय गांधी भाजी मार्केट मधील खुल्या जागेवरील आणि रस्ता बाधीत जागेवरील एकूण सहा अतिक्रमण काढण्यात आले. याबाबत काही नागरिकांनी जे गाळे अधिकृत अलर्ट झाले नाहीत अशा खुल्या जागेवर टिन पत्र्याचे शेड उभारून तसेच कच्चे पक्के बांधकाम करून दहा बाय पंधरा दहा बाय दहा तर पंधरा बाय दहा अशा विविध आकाराचे सहा दुकानाचें बांधकाम करून अतिक्रमण केले होते. या सर्वांचे अतिक्रमण काढून साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तसेच या परिसरातून रस्त्यावरील दोन चारचाकी हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहे. याच परिसरातील नागरिकांच्या तक्रारी व इतर स्थळ पाहणी अहवाला नुसार नाल्यावरील अतिक्रमण बाबत स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे व नाल्यावरील अतिक्रमण काढून नाला पूर्णपणे मोकळा करण्यात येणार आहे.

याबाबत आज अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, सिडको कार्यालयाचे मिलन खिल्लारे, नगर रचना विभागाचे मनपा पूजा भोगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण स्थळ पाहणी करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी मार्किंग करून अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तरी नाल्यावरील स्वतः चे पत्र्याचे शेडचे व इतर कच्चे स्वरूपातील बांधकाम नागरिकांनी स्वतः काढावे नसता हे सर्व अतिक्रमण मनपाच्या वतीने काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सदर मोहीम प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे ,सिडकोचे मिलन खिल्लारे, मनपा नगर रचना विभागाचे पूजा भोगे अतिक्रमण तथा बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद ,रामेश्वर सुरासे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कारवाई सहभाग घेतल्याची महिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!