छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका

मुकुंदवाडी ते विमानतळ हरितपट्टयातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढले !

संभाजीनगर लाईव्ह, दि.११फेब्रुवारी – मुकुंदवाडी ते चिकलठाणा विमानतळ या मार्गावरील हरितपट्टयातील एकूण ३० अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने .प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त २ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ,पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये यांच्या अधिपत्याखाली शहरातील मुकुंदवाडी ते चिकलठाणा विमानतळ या मार्गावरील हरितपट्टयातील एकूण ३० अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

यावेळी पी बी गवळी,सागर श्रेष्ठ ,अतिक्रमण विभाग पथक,मनपा पोलीस ए एस आय निर्मला ठाकरे व कर्मचारी यांची उपस्थिती होती. अशी माहिती अतिक्रमण विभागच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!