छत्रपती संभाजीनगर
Trending

मराठवाड्यातील १७८६ अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी ! जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा !!

मुंबई, दि. २० – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागातील एकूण १७८६ अस्थायी पदांना दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आजच जारी करण्यात आला आहे. त्यामुळे १७८६ जणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वित्त विभागाच्या दिनांक ०८/०२ / २०२३ च्या शासन निर्णयास अनुसरुन विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग, तसेच जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद) व बीड यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी या क्षेत्रिय कार्यालयातील आकृतीबंधातील १७८६ अस्थायी पदांना दिनांक ०१/०३/२०२३ ते दिनांक ३१/०८/२०२३ या कालावधीसाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक १३/०३/२०२३ च्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली होती.

२. वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ३१/०८/२०२३ व शासन शुध्दिपत्रक दि.०६/०९/२०२३ अन्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक २९/०२/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यास अनुसरुन विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग, तसेच जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद) व बीड यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी या क्षेत्रिय कार्यालयातील आकृतीबंधातील १७८६ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

असा आहे शासन निर्णय :-

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, तसेच जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद) व बीड यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मंडळ अधिकारी या क्षेत्रिय कार्यालयातील आकृतीबंधातील १७८६ अस्थायी पदांना दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ ते दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीसाठी वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ३१/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील अटींच्या अधीन राहून व शासन शुध्दिपत्रक, दिनांक ०६/०९/२०२३ अन्वये मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च संदर्भाधीन क्र.०३ येथील शासन निर्णयासोबतच्या संबंधित विवरणपत्रातील रकाना क्र.०५ मध्ये दर्शविलेल्या लेखाशिर्षाखालील सन २०२३-२४ साठी मंजूर झालेल्या अर्थसंकल्पिय अनुदानातून भागविण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

३. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक ३१/०८/२०२३ च्या शासन निर्णयात दरम्यानच्या काळात सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे तसेच यानंतर सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही, याची सर्व विभागांनी नोंद घेण्याबाबत वित्त विभागाने निर्देशित केले आहे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!