महाराष्ट्र
Trending

तलाठी संवर्गातील ४ हजार ५९ अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी !

मुंबई, दि. २९ – राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून यासंदर्भातीन शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाचा राज्यातील ४०५९ तलाठ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कंत्राटी धोरण राबवत असलेले शिंदे फडणवीस सरकार या तलाठ्यांना केव्हा कायम करणार, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. २०/०३/२००६ अनुसार क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संपुर्ण राज्यासाठी तलाठी संवर्गाची एकूण १२६३७ मंजूर पदे होती. तथापि, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यांत दोन तालुका एक उपविभाग समायोजनाच्यावेळी करवीर उपविभागाकडील १ तलाठी पद व्यपगत झाले. तसेच राज्यातील उपविभागाची पुनर्रचनेनुसार कोकण विभागात सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उपविभाग कणकवली-१ व उपविभाग सावंतवाडी-१ अशी २ पदे कमी झालेली आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत आता जुन्या आकृतिबंधानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची मंजूर पदांची संख्या १२६३४ अशी आहे. सदर मंजूर पदांपैकी ४०५९ पदे ही अस्थायी आहेत. सदर अस्थायी पदांना सदर्भाधीन शासन निर्णय अन्वये दि.०१/०३/२०२३ ते दि.३१/०८/२०२३ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सदरची मुदत संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या अखत्यारितील अस्थायी पदांना दि. ०१/०९/२०२३ ते दि.२८/०२ / २०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. दिनांक ०६.०९.२०२३ रोजीच्या शासन शुद्धीपत्रकान्वये, अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक व अमरावती यांनी तलाठी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. सदर पदांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

असा आहे शासन निर्णय-
१. संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदापैकी ८५७५ पदे स्थायी असून, उर्वरित ४०५९ पदे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०५९ अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२३ ते दि. २९/०२ / २०२४ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भ क्र. ३ वरील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय तलाठ्यांची यादी वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून PDF फाईल डाऊनलोड करा-

तलाठी शासन निर्णय

Back to top button
error: Content is protected !!