तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढ, वेळापत्रकात बदल !

नांदेड, दि. 10- प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या तिरुपती-औरंगाबाद-तिरुपती विशेष गाडीला श्री साईनगर शिर्डी पर्यंत वाढविण्यात आले आहे, तसेच या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 07637 तिरुपती ते श्री साईनगर शिर्डी विशेष गाडी दिनांक 22 आणि 29 जानेवारी तसेच 5, 12, 19 आणि 26 फेब्रुवारी, 2023 दरम्यान तिरुपती येथून दर रविवारी सकाळी 05.30 वाजता सुटेल
आणि रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, विकाराबाद, बिदर, परळी वैजनाथ, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे सोमवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07638 श्री साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष गाडी दिनांक 23 आणि 30 जानेवारी तसेच 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी, 2023 दरम्यान श्री साईनगर शिर्डी येथून दर सोमवारी रात्री 19.35 वाजता सुटेल
आणि अंकाई, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी, परळी वैजनाथ, बिदर, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी रात्री 23.55 वाजता पोहोचेल.