महाराष्ट्र
Trending

केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दर महिना जमा होणार रक्कम ! तहसीलच्या पुरवठा विभागात ही कादपत्रे देणे बंधनकारक !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दिनांक 24 -: राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्‍ठ न झालेल्‍या एपीएल (केशरी) शेतकरी योजना शिधापत्रिका धारक लाभार्थ्‍यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्‍नधान्‍याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रु 150/- इतक्‍या रोख रकमेच्‍या थेट हस्‍तांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदरील योजनेचा लाभ मिळण्‍याकरीता छत्रपती संभाजीनगर जिल्‍हयातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतक-यांना अन्‍नधान्‍याऐवजी थेट रोख रक्‍कम हस्‍तांतरण योजनेचा लाभ मिळण्‍याकरिता अर्ज करावा. अर्जचा नमुना सर्व तहसिल कार्यालय, जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय तसेच रास्‍त भाव दुकानदार येथे उपलब्‍ध करून देण्‍यात आलेला आहे.

संबंधित लाभार्थ्‍यांनी सदर अर्ज प्राप्‍त करून घेऊन योग्‍य ती माहिती भरावी. त्‍यासोबत शिधापत्रिकेतील सर्व सदस्‍यांचे आधार कार्डची छायाकिंत प्रत, कुटूंबातील महिला प्रमुखांचे बॅंके पासबुकच्‍या पहिल्‍या पानाची छायांकित प्रत, शिधापत्रिका पहिल्‍या व शेवटच्‍या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्र संलग्‍न करून संबंधीत तहसिल कार्यालय पुरवठा शाखेमध्ये जमा करावेत.

सदरील योजने अंतर्गत जिल्ह्यात 72189 शिधापत्रिका व 324035 नोंदित लाभार्थी आहेत. कोणताही पात्र लाभार्थी अन्‍नधान्‍या ऐवजी प्रतिमाह, प्रति लाभार्थी रु 150/- इतक्‍या रोख रक्कमे पासून वंचित राहणार नाही व त्वरित रक्कम वितरण करने शक्य होईल याकरिता सर्व एपीएल शेतकरी लाभार्थी यांनी त्वरित अर्ज भरून तहसिल कार्यालयात जमा करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारीआस्तिक कुमार पाण्‍डेय तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा राणी भोसले यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!