जालना रजिस्ट्री कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्याच्या मानेवर चाकूने प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार !

जालना, दि. २ मार्च- जालना रजिस्ट्री कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्याच्या मानेवर चाकूने हल्ला चढवत हल्लेखोर पसार झाला. जूना जालना भागातील मुक्तेश्वर वेशीजवळील चहाच्या हॉटेलसमोर आज, गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संभाजी उर्फ सुहास संपतराव डेंगळे (वय 50) असे जखमीचे नाव आहे.
जालन्यातील रजिस्ट्री कार्यालयाजवळ मुद्रांक विक्रेता संभाजी डेंगळे यांचे कार्यालय आहे. आज, २ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता कार्यालय जवळ असलेल्या चहाच्या हॉटेलवर डेंगळे आपल्या मित्रांसह चहा पिण्यासाठी गेले होते. तेथे डेंगळे यांच्या बाजुला एक अनोळखी व्यक्ती बसला होता. काही वेळातच त्या अनोळखीने संभाजी ढेंगळे यांच्या मानेवर चाकू हल्ला चढवला. हल्ला करून तो तातडीने पसार झाला.
मुंद्राक विक्रेते संभाजी ढेंगळे यांच्या मानेला मोठी दुखापत झाली असून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सय्यद मझहर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एक पथक हल्लेखोराच्या मागावर रवाना करण्यात आले आहे. कदीम जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरु आहे.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne