महाराष्ट्र
Trending

गेवराईत राजकीय नेत्यांच्या बॅनरवर लेकरांना लघुशंका करायला लावली ! फोटा आणि व्हिडियो काढून सोशल मीडियावर प्रसारित केला, २० जणांवर गुन्हा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेल्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर राजकीय नेत्यांच्या बॅनरवर लहान मुलांना लघुशंका करायला लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५ ते २० जणांनी या लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी हे कृत्य करायला प्रवृत्त केल्याचा गुन्हा गेवराई पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिस हवालदार धन्यपाल प्रविण लोखंडे (नेमणुक पोलीस ठाणे गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि 29/10/23रोजी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान गेवराई शहरातील शास्त्री चौक येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होते. त्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली. त्यावेळी तेथे १५ ते २० जण हे मराठा आरक्षणासाठीच्या घोषणा देत होते.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर राजकीय नेते यांचे फोटो बॅनर तयार करून रस्त्यावर खाली अंथरले. त्यावर अर्धनग्न अवस्थेत असलेले आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना सदर राजकीय नेत्यांच्या फोटो बॅनरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केले व सदर सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करण्यास भाग पाडले. याचे व्हिडीओ चित्रण व फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले.

Back to top button
error: Content is protected !!