महाराष्ट्र
Trending

सत्ताधारीच कार्यकर्त्यांना हताशी धरून घर जाळून घेताय, मनोज जरांगे पाटलांनी शंभर टक्के व्यक्त केली शंका ! जाळपोळ, उद्रेक करू नका अन्यथा पत्रकार परिषद घेवून वेगळा निर्णय घेणार !!

मराठा समाजाला केले शांततेचे जाहीर आवाहन

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – अतिशय शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन आज काही ठिकाणी आक्रमक पद्धतीने करण्यात आले. बीडमध्ये एकाच दिवशी दोन आमदारांचे बंगले जाळण्यात आले असून या हिंसक आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले. ही जळपोळ उद्यापर्यंत जर थांबली नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सत्ताधारीच कार्यकर्त्यांना हताशी धरून घर जाळून घेताय अशी शंभर टक्के शंकाही मनोज जरांगे पाटील यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास व्यक्त केली.

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला आज जाहीर आवाहन करतो की, आज रात्री आणि उद्या दिवसभरात मला कुठेही जाळपोळ केल्याची किंवा नेत्यांच्या घरी आपण बळंच गेल्याची बातमी कानावर आली नाही पाहिजे. अन्यथा मला उद्या संध्याकाळी पत्रकार परिषद घेवून वेगळा निर्णय घ्यावा लागेल.

यासंदर्भात मी आज आणि उद्या माहिती घेणार आहे की ही जाळपोळ नेमकी कोण करत आहे. बहुतेक असा अंदाज आहे सत्ताधार्यातीलच लोकं त्यांच घर जाणून बुजून कार्यकर्त्यांच्या हातानं जाळून घेत आहे आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावत आहे. ही माझी शंका शंभर टक्के खरी निघणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!