छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

अंडा ऑम्लेट व फिश फ्रायचे पैसे मागितल्यावरून फायटरने दोन दात पाडले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – अंडा ऑम्लेट व फिश फ्रायचे पैसे मागितल्यावरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. फायटरने दोन दात पाडले. दरवेस चिकन शॉपच्या बाजुला सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली.

सैय्यद साकेर सैय्यद मुर्तुजा (वय ५०, व्यवसाय अंडा आमलेटचा व्यवसाय, रा. दरवेस चिकन शॉपच्या बाजुला, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.

यातील आरोपीतांनी संगणमत करून अंडा आम्लेट व फिश फ्राय ऑर्डर केली. ती ऑर्डर दिल्यानंतर पैशांची मागणी केल्याच्या कारणांवरून यातील 1) गणेश 2) अण्णा व त्याच्या सोबत दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमत करून फिर्यादीस व फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ केली. हाताचापटाने मारहाण केली. गणेश याने फायटरने फिर्यादीच्या डोळ्याच्यावर व तोंडावर फायटरने मारून दोन दात पडून तोंडातून व डोळ्याच्यावर जखमी केले.

याप्रकरणी जखमी सैय्यद साकेर सैय्यद मुर्तुजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलिस स्टेशनमध्ये 378/2024 कलम 118(2),115 (2),352,3 (5)BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि काळे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!