वैजापूर तालुक्यात लुटमार करणारा श्रीरामपूरचा आरोपी अटकेत ! वेशांतर केलेल्या पोलिसांनी झडप घालून मुसक्या आवळल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २०- वैजापूर तालुक्यात लूटमार करणारे चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. त्याच्या ताब्यातून चोरीच्या ४ मोटारसायकली जप्त केल्या. एकूण २१३००० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. ज्ञानेश्वर संताराम मोरे (वय १९ वर्षे रा.इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक ०४/०९/२३ रोजी पोलीस ठाणे वैजापूर येथे अक्षय अंबादास मोरे (वय २४ रा. भायगाव ता. वैजापूर) यांनी तक्रार दिली की, नांदुरशिकारी येथून संध्याकाळी पत्नीला घरी घेवून जात असतांना विश्रांतीसाठी रोटेगाव रेल्वे पुलाच्या पुढे जुना जरुळ जाणारे रोडच्या पुढे मोकळया जागेत थांबले असतांना दोन अनोळखी हे मोटरसायकलवर आले. जबरदस्तीने जीवे मारण्याची धमकी देवून त्यांचे पत्नीचे गळ्यातील मंगळसूत्र, चांदीचे ब्रासलेट व गळयातील अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचा ओम व आयटेल कंपनीचा मोबाईल हँडसेट असा एकूण ३३,५००/- रु चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून भादंवी कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नमूद गुन्हयांचा समांतर तपास करित असताना सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली की, हा गुन्हा श्रीरामपूर तालूक्यातील भोकर येथील ज्ञानेश्वर मोरे याने त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासह मिळून केला असल्याची माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता आरोपी हा त्याच्या गावी इंदिरानगर, भोकर, ता. श्रीरामपुर येथे असल्याबाबत माहिती पोलिसांना मिलाली. स्थागुशाच्या पथकांने इंदिरानगर, भोकर या गावात वेशांतर करून सापळा लावला. यादरम्यान संशयित ज्ञानेश्वर मोरे हा त्याच्या घराकडे येत असताना दबा धरून बसलेले पोलिसांच्या पथकाला दिसताच पथकाने त्याच्यावर झडप घालुन त्याला ताब्यात घेतले.
गुन्हयाचे अनुषंगाने त्याच्याकडे विचारपुस करता तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्याच्यावर अधिक संशय बळावला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता सदर गुन्हा हा त्याचा विधीसंघर्षग्रस्त बालक साथीदारसह त्याने केल्याची कबुली दिली. यावरुन १) ज्ञानेश्वर संताराम मोरे (वय १९ वर्षे रा.इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपूर) यास सदर गुन्हयात अटक करण्यात येवून पुढील तपास वैजापूर पोलिस करीत आहे.
त्याच्या ताब्यातून ०४ चोरीच्या मोटरसायकल यासह सदर गुन्हयातील चांदीचे ब्रासलेट, सोन्याचा दागिना, मोबाईल फोन असा एकूण 2,13,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष वाघ, पोनि स्था.गु.शा, पोउपनि भगतसिंग दुलत, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दीपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मीक निकम, अशोक वाघ, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe







