छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

शेअर मार्केटमध्ये जास्तीचा फायदा देण्याचे आमिष दाखवून 8 लाख 75 हजारांना गंडवले !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा फायदा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. एकूण 8,75,000/- रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11/03/202 ते द. 07/05/2024 दरम्यान बालाजी अपार्टमेंट, कोहीनुर प्लाझा हॉटेल जवळ, नवीन समर्थनगर येथे हा प्रकार झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. श्रीमती कलिस्ता शर्मा, देव शहा अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात सुरज किशोर बाहेती यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील आरोपी CINV STOCK TRADING GROUP ग्रुपच्या श्रीमती कलिस्ता शर्मा व देव शहा यांनी आपआपसात संगनमत करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीचा फायदा होतो असे फिर्यादीस अमिष दाखवले.

फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर वेळोवेळी एकूण 8,75,000/- रुपये ट्रान्सफर करून गुंतवणुक केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम फिर्यादीला परत न करता आरोपींनी सदरची रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी सुरज किशोर बाहेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीमती कलिस्ता शर्मा व देव शहा यांच्यावर 182/2024 कलम 420, 34 भांदवी सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम  2000 कलम 66 (ड) नुसार क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पीआय माने करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!