छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

हॉटेल बंजारात रात्री 11.30 वाजता MIT कॉलेज इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांचा राडा ! जेवणाच्या टेबलावरून उठवून लाकडी दांड्याने मारहाण !!

छत्रपती संभाजीनगर, दि. १ – MIT कॉलेज इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांचा हॉटेल बंजारात रात्री ११.३० वाजता राडा झाला. सिनियर विद्यार्थ्यांच्या एका गटाने जेवण करत असलेल्या एका गटाच्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या टेबलावरून उठवले. हॉटेलबाहेर नेले व तेथे लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील गुरु लॉन्सजवळ असलेल्या हॉटेल बंजारात घडली.

भूषण संतोष जाधव (वय 23 वर्षे, व्यवसाय शिक्षण, राहणार- रामचंद्र हॉल, बीड बाय पास रोड, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. भूषण जाधव याने पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, MIT कॉलेजमध्ये इंजिनीअरींगचे शिक्षण घेत आहे. दिनांक. 30/05/2024 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास भूषण जाधव व सोबत तीन मित्र बीड बायपास रोड येथील गुरु लॉन्सजवळ असलेल्या हॉटेल बंजारा येथे जेवण्यासाठी गेले होते.

ते जेवण करत असताना भूषण जाधवच्या तोंड ओळखीचे MIT कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे सिनीअर विद्यार्थी राहुल जाधव, अमोल जाधव, वैभव राठोड, साईराज मुंढे हे सुद्धा हॉटेल बंजारा येथे जेवण्यासाठी आले. ते जेवण करत असलेल्या टेबलाजवळ आले व त्यातील एक जण म्हणाला की, “तुम्ही येथे काय करत आहे? तुम्ही येथून उठा” असे म्हणून राहुल जाधव याने भूषण जाधव याच्या सोबत असलेला एका मित्राला शिवीगाळ करून हाताचापचाने मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यानंतर भूषण जाधव व त्याच्या मित्राला जेवण्याच्या टेबलावरून उठवून हॉटेलच्या बाहेर घेवून गेले. हॉटेलच्या बाहेर घेवून आल्यानंतर साईराज मुंडे याने हॉटेलच्या बाहेर पडलेल्या लाकडी दांड्याने भूषण जाधव याच्या डोक्यात मारून जखमी केले. भूषण जाधव याच्या मित्रालाही लाकडी दांडाने व लाथाबुक्याने मारहाण करून तेथून ते निघून गेले. जखमींनी घाटीत प्रथमोपचार घेतला व पोलिस ठाणे गाठले.

याप्रकरणी जखमी भूषण जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल जाधव, अमोल जाधव, वैभव राठोड, साईराज मुंढे यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुरनं. 340/2024 कलम 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोह कोंडके करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!