टीव्ही सेंटर परिसरातील अतिक्रमित चार दुकानांवर हातोडा ! हायकोर्टाच्या आदेशानंतर सिडकोत पाडापाडीची मोहीम !!
आज दिवसभर एम २ भागात राबवली मोहीम, ३० अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाईचा बडगा

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील बांधकाम आणि पार्किंगच्या जागेवर केलेले पत्र्याचे शेड काढण्याची मोहीम सुरु असून या अंतर्गत जिजाऊ चौक टीव्ही सेंटर येथे महानगरपालिकेच्या शौचालय लगत वीस बाय पन्नास या आकाराच्या जागेत मागील तीस वर्षापासून असलेले चार दुकानांचे अतिक्रमण आज पाडण्यात आले.
सदर अनधिकृत बांधकाम करून दुकानदार सुलभाबाई श्रीपाद जाधव दहा बाय पंधरा, अरुण अण्णा रोडगे पाटील दहा बाय दहा, जगतसिंग परिहार दहा बाय वीस या जागेवर अतिक्रमण करून भजी वडापाव व चहा स्टॉल टाकले होते. या लोकांकडे सिडको कडील भाडे करारनामा किंवा महानगरपालिकेचा भाडे करारनामा काहीच नसताना सर्रास खुलेआम मागील तीस वर्षापासून यांचे अतिक्रमण सुरू होते.
जिजाऊ चौक मधील हे अतिक्रमण आज काढण्यात आले व शौचालय जाण्यासाठी पूर्णपणे रस्ता मोकळा करण्यात आला. सदरील अतिक्रमण काढल्याने या परिसरातील नागरिकांनी या उल्लेखनीय कामाबद्दल स्वतःहून प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. यानंतर एन ०९, एम ०२ रोड येथील नाल्यालगत असलेले महिंद्र बकरीया यांचे अंदाजे वीस बाय 30, नंदू खैरनार यांचे दहा बाय 30 या आकाराच्या जागेतील अतिक्रमण काढण्यात आले.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
आज पूर्ण मोहीम दिवसभर एम ०२ भागात राबविण्यात आली असून एकूण याशिवाय इतर ३० अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये पत्र्याचे शेड व दुकानांचे ओटे,पत्र्याचे शेड काढल्यामुळे पूर्णपणे रस्ता मोकळा झाला आहे. यानंतर दुसऱ्या पथकाने आज काल ज्या इमारती वरून वाद झाला होता ती राहिलेली दोन मजली गोखले यांची इमारत आज पूर्णपणे जमीन दोस्त केली. सदर कारवाई दुपारी दोन वाजता सुरू करण्यात येऊन चार वाजता ती पूर्ण करण्यात आली.
याशिवाय या पथकाने छोटे-मोठे लहान बोर्ड काढून रस्ता मोकळा केला आहे. सदर मोहीम अशी सुरू राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. एन ०९, एम ०२ रोड येथे भाकरिया यांनी कारवाईला विरोध केला असता त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला परंतु पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांना जुमानत नसल्याने पोलीस निरीक्षक संभाजी पवार सिडको एन ०७ पोलीस स्टेशन यांनी संबंधिताला समजून सांगितले व प्रसंगी पोलिसी भाषा दाखवल्यानंतर त्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला नाही.
ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार व पोलीस पथक पीएसआय घायाळ, नगररचनाचे उप अभियंता बाळासाहेब शिरसाट, पूजा भोगे, सिडकोचे चौधरी, मोरे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित बाबुराव गवळी, रामेश्वर सुरासे, मजहर अली यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.