महाराष्ट्र
Trending

परभणी जिल्ह्यात चौघांचा बळी, चार जण जखमी ! पूर्णा, परभणी आणि गंगाखेडमध्ये गारपिटीचा तडाखा !!

परभणी, दि. १७ – अलिकडच्या काही दिवसांपासून निसर्गाने अवकृपा केली असून आज, दिनांक 17.03.2023 रोजी परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे चार जणांचा मृत्यू आणि चौघे जखमी झाले. पूर्णा परभणी आणि गंगाखेडमध्ये गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रोगट वातावरण पसरले आहे.

जीवित हानी वीज पडून मृत्यू : 1. बाळासाहेब बाबुराव फड (वय 60 वर्षे), 2. परसराम गंगाराम फड (वय 40 वर्षे, मौजे उखळी ता. गंगाखेड जि परभणी), 3. आबाजी केशव नहातकर (रा.साडेगाव ता जि परभणी), 4. ओमकार भागवत शिंदे (वय 15 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

जखमी : 1. राहीबाई बाबुराव फड (75 वर्षे), 2. सतीश सखाराम नरवाडे (29 वर्षे), 3. राजेभाऊ किशन नरवाडे (35 वर्षे), 4. द्वारकबाई भागवत शिंदे (वय 45 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.

 

Back to top button
error: Content is protected !!