महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प !

केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Story Highlights
  • महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदरनौकानयनसागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंतमुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटाजेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठीमुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी आदी अधिकारी उपस्थित होते.

लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी शिवकालीन आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नवीन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रो-रो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील त्यामध्ये मुंबई ते मोरामुंबई ते काशीदमुंबई ते दिघीमुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.

 रो-रो सेवेसाठी बंकर फ्यूलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा तसेच जुन्या प्रवासी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावेपर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!