महाराष्ट्र
Trending

तुकडेबंदी,  ई-मोजणी, पीक पाहाणी, सलोखा योजना, भूसंपादन, बिनशेतीवर लोणीत आजपासून २ दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेत मंथन !!

महसूल विभागाचे लोकाभिमुख, सर्वसमावेशक धोरण निश्चित करणार: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Story Highlights
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

लोणी दि. 22 : जनतेची कामे पारदर्शकरित्या आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून महसूल विभागाचे लोकाभिमुख व सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी लोणी (जि. अहमदनगर) येथे महसूल विभागाच्यावतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. २२ फेबुवारी आणि २३ फेब्रवारी २०२३ ला हे अधिवेशन होणार असल्या‍ची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील पत्रकार परिषदेत दिली.

यंदा प्रथमच ही परिषद लोणीसारख्या ग्रामीण भागात होत आहे. यामध्ये राज्यातील पाच विभागांचे अप्पर मुख्य सचिवदोन विभागांचे प्रधान सचिवजमाबंदी आयुक्तनोंदणी महानि‍रीक्षकसर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारीनोंदणी महानिरिक्षकभूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक उपस्थित राहणार असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले. राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी परिषद महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल असा विश्वास महसूल मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता होणार असून,  दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप सोहळा पार पडणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत नवीन वाळू धोरणआयसरिता २.०विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरणशासकिय जमिनीवरील अतिक्रमणशर्त भंगपानंद रस्ताशिवार रस्तकब्जेपट्टयाने दिलेल्याजमिनींच्या शर्तभंगाबाबतअर्धन्यायिक कामकाजशत्रू संपत्ती अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असूनई-चावडीई-मोजणीई-पीक पाहाणीई-ऑफीससलोखा योजना, भूसंपादन, बिनशेती, तुकडेजोड, तुकडेबंदी अधिनियम अशा विविध विषयांबाबत वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

या परिषदेच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले कीमुख्यमंत्री कृषि सौरवाहिनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात येणार असूनउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगृहऊर्जागृहनिर्माण व पाटबंधारे या सचिवांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वाळू धोरणाबाबतचा मसुदा या परिषदेमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.

या मसुद्यासाठी येणाऱ्या सूचनांच्या अहवालाचा अंतिम मसुदा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती राज्य सरकारला सादर करणार असूनत्यानंतरच अं‍तिम वाळू धोरण जाहीर केले जाणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठअप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय महसूल परिषद लोणी येथे घेण्याबाबतची पार्श्वभूमी विशद करताना मंत्री विखे म्हणाले कीयापूर्वी लोणी येथे खासदार डॉ. बाळासाहेब विखे यांच्या पुढाकाराने आरोग्य परिषद संपन्न झाली होती. या परिषदेतील मसुदा हा देशाच्या आरोग्य धोरणाचा भाग बनला. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केलेल्या प्रवरेच्या पुरा’ मॉडेलचे देशात स्वागत झाले.

कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमही या भूमीत संपन्न झाले आहेत. त्याचदृष्टीने ही महसूल परिषद राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

Back to top button
error: Content is protected !!