महाराष्ट्र
Trending

बीड जिल्ह्यातील धारूरच्या सॉफ्टवेअर इंजीनियरला ऑनलाईन गंडवले ! यूट्यूब टास्कच्या नावाखाली १५ हजारांचे गाजर देऊन २ लाख ८५ हजार उकळले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – यूट्यूबचे टास्क पूर्ण केल्यास प्रत्येक टास्कला ५० रुपये दिले जातील असा व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज पाठवला. त्यानंतर समोरच्या भामट्यांनी १५०० रुपये दिलेही. मात्र, त्यानंतर त्यांनी टाकलेल्या जाळ्यात सॉफ्टवेअर इंजीनियर असा अडकत गेला की हातचे २ लाख ८५ हजार रुपये गमावून बसला.

मुशिर जहीर अहमद (वय 32 वर्षे, व्यवसाय सॉफ्टवेअर इंजीनियर, रा जहाँगीर मोहा ता. धारूर, जि. बीड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. मुशिर जहीर अहमद यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 21/06/2023रोजी दुपारी 14.29 वाजता घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकाला लिंक असलेले व्हॉटसअ‍ॅपवर एक मॅसेज आला की, युट्युबचे काही टास्क तुम्हाला दिले जातील त्यासाठी तुम्हाला प्रत्येक टास्कला 50/-रुपये दिले जातील जेवढे जास्त टास्क तुम्ही कराल तेवढे जास्त पैसे तुम्हाला भेटतील. त्यानंतर कोड पाठवला व एक टेलीग्रामची लिंकही पाठवली.

त्यानंतर सॉफ्टवेअर इंजीनियर मुशिर जहीर अहमद हे त्या लिंकवर गेले असता त्या ठिकाणी एक आयडी प्राप्त झाली. ती आय.डी. ओपन केली असता त्यामध्ये प्रोफाईलवर एक महिलेचा फोटो व त्या फोटो खाली टेलीग्राम आयडी वरून मॅसेज प्राप्त झाले. त्यांनी दिलेल्या मॅसजेप्रमाणे टास्क पूर्ण करत गेल्यानंतर सॉफ्टवेअर इंजीनियर मुशिर जहीर अहमद यांना 1500/- रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी नविन वेलफेयर टास्कसाठी काही पैसे भरावे लागणार आहेत ते तुम्ही आमच्या अकाउंट नंबरवर भरा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे वेगळे पैसे भेटतील असे सांगितले. 150000/- रुपये ऑनलाईन पैमेंट पाठवा असे सांगण्यात आले.

त्यानुसार दिनांक 22/06/2023 रोजी MOBILE BANKING APP द्वारे 5000/-रुपये, 30000/- रुपये, 15000/-रुपये पाठवले तसेच एका अन्य अकाऊंटवर 90000/- रुपये ICICI MOBILE BANKING APP द्वारे पाठवले. वरील पाठवलेल्या रक्कमेपैकी सॉफ्टवेअर इंजीनियर मुशिर जहीर अहमद यांना परत 5000/-रुपये प्राप्त झाले होते. दिनांक 23/06/2023 रोजी सदर व्हॉटसप मोबाईल क्रमांकावरुन YES BANK चे खाते दिले. सदर खात्यावर 100000/-रुपये, 25000/-रुपये पाठवण्यास सांगितले. त्या खात्यावर 100000/- रुपये व 25000/- रुपये MOBILE BANKING APP द्वारे पाठवले.

त्यानंतर दिनांक 24/06/2023 रोजी त्यांनी सांगितले की, तुम्ही गुतंवणुक केलेली रक्कम परत देण्यासाठी आणखी पैसे पाठवा असे सांगून त्यांनी एका खात्यावर 25000/-रुपये पाठवण्यास सांगितले असता, संबधित खात्यावर MOBILE BANKING APP द्वारे पे झाले नाही. तसे त्यांना कळवले असता, त्यांनी दुसर्या एका खात्यावर 25000/-रुपये पाठवण्यास सांगितले होते. परत त्या खात्यावर MOBILE BANKING APP द्वारे रक्कम पे झाली नाही. त्यानंतर पुन्हा दुसर्या खात्यावर रक्कम टाकायला सांगितली. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजीनियर मुशिर जहीर अहमद यांना समोरच्या व्यक्तीवर संशय निर्माण झाला.

टेलीग्राम चॅटींगद्वारे पैसे परत मागितले असता, त्यांनी काहीएक रिप्लाए दिला नाही. एकूण २ लाख ८५ हजारांची फसवणूक समोरच्या भामट्यांनी केली. याप्रकरणी सॉफ्टवेअर इंजीनियर मुशिर जहीर अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!