छत्रपती संभाजीनगर
Trending

धूम स्टाईल मोटारसायकल चालवल्याने राडा: विद्यापीठ गेटजवळ दोन चापटा मारल्याने बदला घेण्यासाठी पाठलाग करून मिलींद चौकात बेल्टने मारले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – विद्यापीठ गेटजवळ मोटारसायकल जोरात चालवली म्हणून उभ्या असलेल्या मुलाने शिवीगाळ केली. यावर शिवीगाळ करणार्या मुलाला दोन चापट मारल्या. त्यानंतर त्या मुलाने शाईन गाडीवर त्यांचा पाठलाग करून त्याला बेल्टने मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरातील मिलींद चौकात हा राडा झाला.

हर्षद श्याम जावळे (रा जयसिंग पुरा छोटी मज्जीदच्या मागे, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.  हर्षदने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दि 8/7/2023चे रात्री (08.30 वाजेच्या सुमारास विद्यापीठ गेट जवळून तो आणि त्याचा मित्र रोहीत सलामपुरे दुचाकीवर जात होते. गेट जवळ उभ्या असलेल्या मुलाने तू गाडी जोरात का चालवतो असे म्हणून हर्षद जावळेला शिवीगाळ केली. त्यामुळे हर्षद जावळे व तेथे उभ्या असलेल्या मुलाचा वाद झाला. त्यावेळी हर्षद जावळेने त्यास दोन थापडा मारल्या होत्या.

दरम्यान, दि 8/7/2023 रात्री 11.30वाजेच्या सुमारास हर्षद जावळे व मित्र रोहीत सलामपुरे दुचाकीवर विद्यापीठ गेटकडून छावणीकडे येत असताना ज्या मुलासोबत भांडन झाले होते त्याने हर्षद जावळेला थांबायला सांगितले. मात्र, हर्षद जावळेने तेथे माझी गाडी थांबवली नाही. तेव्हा सदरच्या मुलाने शाईन गाडीवर त्याच्या मित्रासोबत पाठलाग केला.

त्यांनी मिलींद चौक येथे आल्यावर हर्षद जावळे याच्या गाडीला लाथ मारली. त्यावेळी गाडी खाली पडली. विद्यापीठ गेटजवळून शाईन गाडीवरील दोघे व मिलींद चौक येथे आणखी एका दुचाकीवरी दोघे अशा एकूण दोन दुचाकींवरी चौघे हर्षद जावळेजवळ आले. कमरेचा पट्टा फरशी व हाताचापटांनी त्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून तेथून त्यांनी धूम ठोकली.

त्यावेळी तेथुन जाणार्या मित्राने व काही लोकांनी हर्षद जावळेला उपचारासाठी घाटी दवाखाना येथे दाखल केले होते. हर्षद श्याम जावळे याने दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिस स्टेशनमध्ये ४ अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!