फुलंब्रीच्या देवगिरी कारखान्याजवळ ओळख झाली, दोघी कारमध्ये बसल्या ! गंगापूरच्या दोन भामट्यांनी खुलताबादच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून गंडवले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ : फुलंब्रीच्या देवगिरी कारखान्याजवळ ओळख झाली, दोघी गाडीत बसल्या. गप्पा सुरु झाल्या अन् गंगापूरच्या दोन भामट्यांनी खुलताबादच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून गंडवले. एकूण 3,25,000/- रुपये वेळोवेळी फोन पेच्या माध्यमातून फसवणूक केल्याची तक्रार खुलताबाद पोलिसांत दाखल झाली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय गोविंद साबळे व मधुकर निवृत्ती रोकडे (दोन्ही रा. शिवराई ता. गंगापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
महिलेने (रा. पिंपळगाव ता. फुलब्री जि. छञपती संभाजीनगर .ह. मु. पळसवाडी ता. खुलताबाद) दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि.03/04/2024 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारस फिर्यादी महिला व तिची मुलगी दोंघी पळसवाडी येथून मौजे पिंपळगाव ता. फुलब्री येथे लग्न असल्याने पळसवाडी येथून खुलताबाद येथे बसने आल्या. पुढे देवगीरी कारखाना ता. फुलबी येथे रिक्षाने गेल्या. त्यानंतर पुढे जाण्यासाठी प्रवासी वाहन लागत नसल्याने दोघी देवगीरी कारखाना येथे थांबल्या असता छञपती संभाजीनगर कडून एक कार त्यांच्या जवळ येवून उभी राहिली. त्यात दोन अनोळखी बसलेले होते व त्यातील जो कार चालवत होता तो फिर्यादी महिलेस म्हणाला की, तुम्हाला कुठे जायाच आहे तेव्हा फिर्यादी महिलेने त्यांना सांगितले की मौजे खिर्डी पिंपळगाव येथे लग्नास जायाचे आहे. त्यांनी त्यांचे नाव संजय गोविंद साबळे व त्याच्या सोबत बाजुला बसलेले व्यक्तीचे नाव मधुकर निवृत्ती रोकडे दोन्ही रा. शिवराई ता. गंगापूर असे सांगितले व आम्ही पण त्याच मार्गे मौजे वाहेगाव येथे चाललो आहे. त्यामुळे फिर्यादी महिला व तिची मुलगी दोघी त्याच गाडीत बसल्या.
त्यातील गाडी चालवत असलेला व्यक्ती संजय गोविंद साबळे रा. शिवराई ता. गंगापूर यांनी फिर्यादी महिलेला विचारले की तुमची मुलगी काय शिकते, तेव्हा फिर्यादी महिलेने त्यास सांगितले की ती नर्सिंग करते. त्यांनी फिर्यादी महिलेस सांगितले की मी सरकारी नोकरीला लावून देतो. तुमच्या मुलीस सरकारी नोकरीस लावायचे काय. त्यावर फिर्यादी महिलेने त्यांना होकार दिला आणि संजय व मधुकर निवृत्ती रोकडे रा.शिवराई ता. गंगापूर यांच्या दोघांच्या पण गप्पा सरकारी नोकरी लावण्यावरून चालु होत्या. त्यामुळे फिर्यादी महिलेला पण खरे वाटले. संजय साबळे यांनी फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर घेतला व त्यावर त्याच्या मोबाईल नंबरवरुन कॉल करून सांगितले की हा माझा नंबर आहे.
त्यानंतर फिर्यादी महिलेने तो नंबर सेव्ह करून घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी महिलेला दि.04/08/2024 रोजी खिर्डी पिंपळागाव तेथे लग्नसाठी थांबलो असता, तेव्हा मोबाईलवर सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास कॉल आला आणि सांगितले की तुमच्या मुलीला सरकारी दवाखान्यात नोकरी लावून देतो. 7,00,000/- रुपये भरा, तेवढे होत नाहीतर आर्धे आता भरा त्यावरून फिर्यादी महिलेने संजय साबळे यांना सांगितले की माझ्याकडे येवढे पैसे आता नाहीत. मी आता माझा पुतण्या यांच्या मोबाईल नंबरवरुन 10,000/- फोन पे करतो व त्यानुसार 10,000/- संजय साबळे यांच्या ऑकाउंटवर ट्रान्सफर केले आणि त्यांना कॉलकरुन सांगितले, पुन्हा त्यांनी मला तात्काळ 60,000/- रुपये भरणे आहे. तात्काळ 60,000/- रुपये पाठवा असे सांगितल्यावरून फिर्यादी महिला खिर्डी पिंपळगाव येथे असताना त्यांच्या गावातील एकास कॉलकरून सांगितले की मुलीला नोकरी लागवण्यासाठी तुझ्या आकाऊंट नंबरवरून 50,000/- रुपये ट्रान्सफर कर. त्यावरून त्यांनी 50,000/- हाजार रुपये संजय गोविंद साबळे यांच्या मोबाईलवर फोन पे केले व त्यानंतर फिर्यादी महिली व तिची मुलगी दि.05/04/2024 रोजी मौजे पळसवाडी ता. खुलताबाद येथे आल्या.
त्यानंतर त्यांनी कॉल करून तुमच्या मुलीला लवकर ऑर्डर देतो, तुम्ही लवकर पूर्ण पैसे पाठवा असे सांगितल्याने फिर्यादी महिलेने त्यांना सांगितले की टप्याने-टप्याने पैसे पाठवितो असे सांगितले तेव्हा त्यांनी काही हरकत नाही नंतर टप्याने पाठवा असे सांगितले. त्यानंतर दि. 24 ते 25 तारखेच्या दरम्यान संजय साबळे व त्याच्या सोबत एक अनोळकी व्यक्ती फिर्यादी महिलेकडे आले होते. त्यावेळस फिर्यादी महिलेने त्यांना विचारले की हा व्यक्ती कोण आहे त्यावेळेस त्यानी सांगितले की हा माझा ड्रायवर आहे. काही वेळ दोघे थांबून संजय साबळे यांनी पाणी पिले व म्हणाला की तुमच्याकडे 20,000/- रुपये राहिले आहे ते तेवढे देवून टाका.
लगेच चार पाच दिवसांत नोकरीची ऑर्डर येईल तेव्हा फिर्यादी महिलेकडे पैसे नसल्याने पैसे भेटले की तुम्हाला पैसे पाठून देते असे त्यांना सांगितले. त्यानंतर ते दोघे गाडीत बसून निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी महिलेने दुसऱ्या दिवसी त्यांच्या फोन पे नंबरवर 20,000/- रुपये ट्रान्सफर केले. दि 04/04/2024 ते 26/04/2024 पर्यंत एकूण 3,25,000/- रुपये वेळोवेळी फोन पे केले. फिर्यादी महिला नोकरीची ऑर्डर कधी येथे याची वाट पाहत होती. तेव्हा संजय गोविंद साबळे व मधुकर निवृत्ती रोकडे दोन्ही रा. शिवराई ता. गंगापूर यांचा मोबाईल बंद येत होता. तेव्हा फिर्यादी महिलेच्या लक्षात आले की संजय गोविंद साबळे व मधुकर निवृत्ती रोकडे रा. शिवराई ता. गंगापूर यांनी नोकरीचे अमिष दाखवून फसवणुक केली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe