खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

गल्ले बोरगावातील अद्रक संशोधन केंद्रास निधी देणार ! आ.सतीश चव्हाणांच्या तारांकित प्रश्नावर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील प्रस्तावित अद्रक संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल व सदरील केंद्रासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आज (दि.20) विधान परिषदेत केली. त्यामुळे यासंदर्भात पाठपुरावा करणारे आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे.

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करावे यासाठी आ.सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अद्रक/मसाले पीक संशोधन केंद्राची आवश्यकता असल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळविण्यासाठी सादर केलेला परिपूर्ण प्रस्ताव कृषी परिषदेने 22 सप्टेंबर 2022 रोजी मान्य करून शासनाकडे सादर केला. मात्र यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाव्दारे उपस्थित होते.

तसेच आ.सतीश चव्हाण यांनी सप्टेंबर 2022 मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी कृषी मंत्र्यांनी गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन सुरू करण्यात येईल अशी घोषणा सभागृहात केली होती.

शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज विधान परिषदेत विरोधी पक्षाच्यावतीने 260 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी गल्ले बोरगाव येथील अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात निधीची काहीच घोषणा करण्यात आली नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सदरील अद्रक संशोधनन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा सभागृहात केली.

Back to top button
error: Content is protected !!