छत्रपती संभाजीनगर
Trending

बड्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जणांना अटक !

एक लाख दोन हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त

Story Highlights
  • तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेची छापेमारी

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२-  जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून एक लाख दोन हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालासह आठ आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एकूण १,०२,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला. तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक २१/०६/२०२३ रोजी गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की, तोरणागडनगर, म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे बाळकृष्ण पंढरीनाथ इंगळे यांच्या राहत्या घरात, काही जण पत्त्यावर पैसे लावून झन्ना मन्ना नांवाचा जुगार खेळत आहे. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला.

सदर ठिकाणी छापा मारला असता १) बाळकृष्ण पंढरीनाथ इंगळे, वय ५८ वर्षे रा. तोरणागडनगर,म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, २) वसीम हरूण कासम कुरेशी, वय ३५ वर्ष, रा पटेलनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, ३) अक्षय अशोक मगरे, वय २५ वर्ष, रा. बौध्द वाडा, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर, ४) राजेंद्र काशिनाथ मरमट, वय ५५ वर्ष, रा. हनुमाननगर गल्ली नं. ५, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर,

५) गणेश भगवान पवार, वय २८ वर्ष रा. विजयनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर, ६) अनिल उखर्डू सपकाळे, वय ४४ वर्ष, रा. भालगाव फाटा, बीड बाय पास, छत्रपती संभाजीनगर, ७) दत्ता अमृत सुरवसे, वय ३६ वर्ष, रा. विजयनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर, ८) आकाश कल्याणराव जाधव वय २३ वर्षे रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर हे पत्त्यावर पैसे लावुन झन्ना मन्ना नांवाचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घतले.

त्यांच्या ताब्यातून ३५,३००/- रूपये रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेटसह जुगाराचे साहित्य असा एकूण १,०२,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर पोलिस स्टेशन मुकुंदवाडी येथे महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा,संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कल्याण शेळके, सफौ शेख हबीब, पोह संजय गावंडे, पोना संजय मुळे, पोना राजेंद्र साळुंके, पोअं अजय चौधरी, मपोअं अनिता त्रिभुवन यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!