छत्रपती संभाजीनगर
Trending

बिल्डिंगवर कॉल सेंटरचा बोर्ड लावायला गेलेल्या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू ! ठेकेदार व कॉल सेंटरच्या मालकावर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- बिल्डिंगवर कॉल सेंटरचा बोर्ड लावण्यास गेलेल्या युवकाचा हायटेन्शन विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घडना २१ जून रोजी दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलिस स्टेशन हद्दीमधील हनुमान नगर चौकाजवळील सेंटर मार्ट या बिल्डिंगवर घडली.

यातील आरोपी ठेकेदर अशिष नवगिरे यांनी ठेका घेतलेल्या हनुमान नगर चौक जवळील सेंटर मार्ट या बिल्डींगवर जिजस कॉल सेंटरचा बोर्ड लावण्यासाठी मुलगा अक्षय चांदणे व सखाराम चांदणे यांना सांगितले. बिल्डींगवर हायटेशन विद्युत पुरवठा तार जवळ असून सुध्दा अशिष नवगिरे यांनी व जिजस कॉल सेंटरचे मालक संजय आरसुड यांनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली नसल्याचा आरोप आहे.

कोणतेही सेफ्टीगार्ड न देता अक्षय व सखाराम यांना बिल्डींगवर पाठवले. अक्षय यास हायटेशन विद्युत तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस ठेकेदार व जिजस कॉल सेंटरचे मालक जबाबदार असल्याची फिर्याद मृत मुलाच्या पित्याने दिली आहे.

याप्रकरणी विष्णू सुदाम चांदणे (वय ५०, रा. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आशिष नवगिरे व जिजस कॉल सेंटरचे मालक संजय आरसूड यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि राठोड करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!