गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

ग्रामसेवक ८ हजारांची लाच घेताना जाळ्यात, गंगापूर तालुक्यातील मालुंजा (खुर्द) ग्रामपंचायतीतला भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलाची मंजुरीसाठी कोणतीही त्रुटी न काढता सदरची फाईल पंचायत समिती गंगापूर येथे मंजुरीकरिता पाठविणेकरिता १० हजारांची मागणी करून ८ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडण्यात आले.

दिलीप गमजू गायकवाड (वय 43 वर्ष, पद-ग्रामसेवक, वर्ग-3, मौजे मालुंजा (खुर्द), तालुका-गंगापूर, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार हे मौजे मालुंजा (खुर्द) ता.गंगापूर येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नावाने रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलाची फाईल सादर केली होती.

या फाईलच्या मंजुरीसाठी कोणतीही त्रुटी न काढता सदरची फाईल पंचायत समिती गंगापूर येथे मंजुरीकरिता पाठविणेकरिता आरोपी ग्रामसेवक दिलीप गायकवाड यांनी पंच साक्षीदार यांच्या समक्ष 10000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 8000/- रुपये रक्कम स्वतः स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेतले असून क्रांती चौक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोना साईनाथ तोडकर, पोअ केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!