गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

गंगापूर वैरागड नारायण गिरी आश्रमातील सप्ताह वर्गणीच्या हिशेबावरून दोघांची सदस्याला मारहाण !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- हरिनाम सप्ताहाच्या वर्गणीवरून दोघांनी सदस्याला मारहाण केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे घडली. वैरागड गावात दर वर्षी प्रमाणे नारायण गिरी आश्रमात सप्ताह सुरु आहे. या सप्ताहासाठी ग्रामस्थ व सप्ताह समितीचे सदस्य गावात वर्गणी जमा करत असताना हिशेबावरून वाद झाला व वादानंतर दोघांनी सप्ताह समितीच्या सदस्याला मारहाण केली.

तुळशीराम रामराव वाघचौरे असे जखमीचे नाव आहे.  उत्तम मंजीनाथ वाघचौरे, सचिन उत्तम वाघचौरे अशी आरोपींची नावे आहेत.  तुळशीराम रामराव वाघचौरे (वय 53वर्षे धंदा शेती रा. वैरागड ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, वैरागड गावात दर वर्षी प्रमाणे नारायण गिरी आश्रमात सप्ताह सुरु आहे. सदर सप्ताहाच्या आयोजनाचे ते सदस्य आहेत.

दि. 25/08/2023 रोजी सकाळी 09.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी तुळशीराम वाघचौरे व सोबत सप्ताह आयोजनाचे सदस्य सोन्याबापू शंकर शेजुळ, मनसुब सीताराम वाघचौरे, कचरु रामराव सुरासे हे गावात सप्ताहाची वर्गणी जमा करत होते. गावातील महादेव मंदिराजवळ असताना उत्तम मंजीनाथ वाघचौरे हे फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांना म्हणाले की, संतोष वाघचौरे यांचे कडे वर्गणी मागणे कामी जा. त्यावर फिर्यादी तुळशीराम वाघचौरे हे त्यांना म्हणाले की, आम्ही काल गेलो होतो. पुन्हा मागणे कामी जात नाही.

त्यावर ते फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांना म्हणाले की, मागच्या वर्षाची व चालू वर्षाची वर्गणी मागा त्याला. त्यावर फिर्यादी तुळशीराम वाघचौरे हे म्हणाले की, मागील वर्षाचा हिशोब माझ्याकडे नाही. हिशोबाची वही मला या मग त्याच्या कडे जाता येईल, असे म्हणाताच उत्तम मंजीनाथ वाघचौरे यांनी फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांना शिवीगाळ करीत लोच लाच करीत चापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्या दरम्यान सचिन उत्तम वाघचौरे याने रोडच्या कडीला पडलेल्या काठी हातात घेवून फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांच्या दोन्ही पाया मारण्यास सुरुवात करून मुक्कमार दिला.

यात फिर्यादी तुळशीराम वाघचौरे हे खाली पडले. तेव्हा दोघांनी फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांना लाथांनी मुक्कामार दिला. व म्हणाले की, आम्हाला हिशोब मागचो असे म्हणत जर आम्हाला खेटला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर उपस्थित लोकांनी सोडवा सोडव केली. त्यानंतर फिर्यादी तुळशीराम वाघचौरे यांनी पोलीस चौकी लासूर स्टेशन गाठले. पोलिसांनी मेडिकल मेमो दिल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार घेतले.

याप्रकरणी तुळशीराम रामराव वाघचौरे (वय 53वर्षे धंदा शेती रा. वैरागड ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम मंजीनाथ वाघचौरे, सचिन उत्तम वाघचौरे यांच्यावर शिल्लेगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, उत्तम मंजीनाथ वाघचौरे यांनी आरोप फेटाळून लावले असून त्यांनीही तुळशीराम रामराव वाघचौरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील लिंकला क्लिक करून वाचा काय आहे त्यांचा आरोप…  सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून सप्ताहाचे निमित्त करून भांडण उकरून काढल्याचा आरोप !

Back to top button
error: Content is protected !!