गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून सप्ताहाचे निमित्त करून भांडण उकरून काढल्याचा आरोप !

गंगापूर तालुक्यातील वैरागड सप्ताहाच्या वर्गणीवरून वाद, दोन्ही गटाच्या शिल्लेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून सप्ताहाचे निमित्त करून भांडण उकरून काढल्याचा आरोप उत्तम वाघचौरे यांनी केला आहे. सप्ताहाचा हिशेब हा कमिटीकडे दिल्यानंतरही सोसायटीच्या निवडणुकीचा राग मनात धरून सप्ताहाच्या हिशेबावरून मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील वैरागड येथील सप्ताहाच्या वर्गणीवरून वाद झाल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.

उत्तम मंजीनाथ वाघचौरे, सचिन उत्तम वाघचौरे यांनी मारहाण केल्याची तक्रार तुळशीराम रामराव वाघचौरे यांनी दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून उत्तम वाघचौरे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात उत्तम वाघचौरे यांनी सांगितले की, ते सकाळी ९ वाजता महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. उत्तम वाघचौरे हे दर्शन करून बाजूला उभे होते. यावेळी तुळशीराम रामराव वाघचौरे हे तेथे आले. तुळशीराम रामराव वाघचौरे यांनी उत्तम वाघचौरे यांना सप्ताहाच्या वर्गनीचा हिशेब मागितला.

उत्तम वाघचौरे हे तुळशीराम वाघचौरे यांना म्हणाले की हिशेब सप्ताह कमिटीकडे दिला आहे. यानंतर तुळशीराम रामराव वाघचौरे यांनी हिशेबाचं रजिस्टर मागितलं. त्यावर उत्तम वाघचौरे म्हणाले की मी हिशेब सप्ताह कमिटीला दिला आहे. त्यामुळे हिशेब सप्ताह कमिटीला विचारा. त्यावर तुळशीराम रामराव वाघचौरे यांनी उत्तम वाघचौरे यांची कॉलर पकडून मारहाण केली.

तुळशीराम वाघचौरे यांचा सोसायटीच्या निवडणुकीला पराभव झाला होता. निवडणूक मतदानावरून तो राग त्यांच्या मनात होता. त्यामुळे सप्ताहाचे निमित्त करून त्यांनी हे भांडण उकरून काढले. असा आरोप उत्तम वाघचौरे यांनी केला आहे. दरम्यान, उत्तम वाघचौरे यांनीही याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांत तुळशीराम रामराव वाघचौरे यांच्याविरोधत तक्रार दिली आहे. दरम्यान, शिल्लेगाव पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे.

दरम्यान, तुळशीराम रामराव वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याची बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. गंगापूर वैरागड नारायण गिरी आश्रमातील सप्ताह वर्गणीच्या हिशेबावरून दोघांची सदस्याला मारहाण !

Back to top button
error: Content is protected !!