महाराष्ट्र
Trending

तू माझ्या नवऱ्याला का बोलती ? तो तुला लय आवडतो का ? असा प्रश्न विचारताच तिघांनी तिला विषारी द्रव पाजले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – तू माझ्या नवऱ्याला का बोलती ? तो तुला लय आवडतो का ? यावरून वाद सुरु झाला आणि दोन महिलांनी आणि एका पुरुषाने सदर महिलेला विषारी द्रव बळजबरीने पाजले. यात सदर महिला बेशुद्ध पडली. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चाकूनाईक तांडा येथे घडली.

बीड येथील शासकीय रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरु असलेल्या महिलेने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दिनांक 8/6/20023 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदर महिला व तिची ननंद दोघीजणी गेवराई तालुक्यातील तांड्याच्या बाजूस आसलेल्या विहीरीवर धुणे धुण्यास गेल्या होत्या. तेथे तांड्यातील अन्य दोघी महिला या पण धुणे धूत होत्या.

दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एक पुरुष तेथे बैल पाणी पाजण्यास आला होता. तेवड्यात एक महिला सदर महिलेला म्हणाली तू माझ्या नव-याला का बोलती ? तो तुला लय आवडतो का ? असे म्हणून शिवीगाळ करू लागली. त्यानंतर सदर महिलेल्या अन्य दोन महिलांनी चापटाबुक्याने मारहाण केली. यात सदर महिला खाली पडली.

त्यावेळी दोन्ही महिलेने सदर महिलेचे हात व पाय धरले व एका पुरुषाने कसलेतरी विषारी औषधाची बॉटल घेऊन सदर महिलेच्या बळजबीरीने तोंडात टाकले. सदर महिलेने यापासून बचावाचा प्रयत्न केला तरीही त्या बॉटलमधील विषारी औषध तोंडात गेले व बाकी औषध साडीवर पडले. यात सदर महिला बेशुध्द झाली.

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बेशुद्ध पडलेल्या सदर महिलेला खाजगी वाहनाने बीड येथील शासकीय रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात दाखल केले. सध्या सदर महिला शुद्धीवर आली असून तिने दिलेल्या तक्रारीवरून दोन महिला व एका पुरुषावर गेवराई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!