छत्रपती संभाजीनगर
Trending

हॉटेल टाकण्यासाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेला घराबाहेर हाकलले ! जालना व पडेगावमधील ६ जणांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – हॉटेल टाकण्यासाठी पाच लाखांची मागणी करून विवाहितेला घराबाहेर काढून दिल्याप्रकरणी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पडेगावमधील ६ जणांवर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने पती सासु सासरे ननंद, दिर मावस सासु नंदई आहेत. फिर्यादी महिलेचे लग्न झाल्या पासून फिर्यादीचा शारीरिक मानसिक छळ सुरु होता. फिर्यादीस पैश्याची मागणी करून मारहाण केली व हॉटेल टाकण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून घरातून हाकलून दिले.

परस्पर नांदण्यासाठी आलीस तर जिवे मारून टाकू अशी धमकी दिली. दि. १०-०९-२०१७ ते १०-०६-२०२३ पर्यंत छळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून 1) शेख सद्दाम शेख जब्बार 2) महिला 3) शेख सत्तार शेख जब्बार 4) महिला (सर्व. रा नूतन वसाहत जालना), 5) महिला (रा पडेगाव), 6) सलीम शेख (रा. पडगाव) यांच्यावर जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

कलम 498 अ, 323, 504, 506, 34 भादवी 3 व 4 हुंडा प्रतीबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि काकड करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!