भोकरदनच्या शेतकऱ्याची नऊ लाखांची फसवणूक ! थाप मारून बनावट गोल्ड क्वाईन देऊन घातला गंडा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – सुरुवातीला दोन टिकल्या सारखे खरे सोन्याचे नाणे देऊन नंतर 260 ग्रॅम सोण्याचे नकली नाणे देवून शेतकर्याची तब्बल नऊ लाखांची फसवणूक एका भामट्याने केली. त्या भामट्याने थाप मारून भोकरदनच्या शेतकऱ्याचे नऊ लाख घेऊन पोबारा केला.
गजानन रामकिसन सहाने (वय 41 वर्षे, व्यवसाय शेती, रा. लक्ष्मी मगर नवे भोकरदन ता. भोकरदन जि. जालना) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन रामकिसन सहाने यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, त्यांचा लहान मुलगा रुषीकेश याच्यासाठी जालन्याची सौनिक शाळा खरफुडी या ठिकाणी अँडमीशन घेण्यासाठी दि- 07/05/2023 रोजी ते गेले होते. गजानन सहाने तेथे बसलेले आसताना एक जण त्यांना भेटला. त्याच्या सोबत गप्पा मारल्या. त्यानंतर त्याने गजानन सहाने यांचा मोबाईल नंबर घेतला. त्याने पण त्याचा मोबाईल नंबर दिला. म्हणाला, तुमच्या मुलाचे अँडमिशन झाले तर मला कळवा. त्यानंतर मुलाचा पेपर संपल्याने गजानन सहाने हे भोकरदन येथे निघून आले.
दि. 10/05/2023 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गजानन सहाने यांना त्या व्यक्तिचा मिसकॉल आला. त्यामुळे गजानन सहाने यांनी त्या व्यक्तीला फोन केला तर तो म्हणाला की, आमच्या पाहुण्याला दोने अडीच किलो सोण्याचे नाणे सापडलेले आहे. ते त्यांना विकायचे आहे. यावर गजानन सहाने हे त्या व्यक्तीला म्हणाले की, मला ते नाणे घ्यायचे नाही. तेव्हा तो व्यक्ति म्हणाला की, तुमच्या कोणी ओळखीचे आहे का तुमच्या मध्यस्तीने आपण सदरचे सोने विकू. त्यावर गजानन सहाने हे त्या व्यक्तिस म्हणाले की, तुम्ही माझ्या सोबत राहिलात तर मी तुम्हाला सदरचे सोने विकण्यासाठी मदत करेन आणि फोन ठेवून दिला.
त्यांनतर सदर व्यक्तीने गजानन सहाने यांना अनेक वेळा फोन करून सोन्याच्या नाण्याचे सॅम्पल पाहण्यासाठी या म्हणाला. दि. 16/05/2023 रोजी सदर व्याकीने गजानन सहाने यांना सिंदखेडराजा येथील असोला रोडवरील खाली प्लॉटवर बोलावून घेतले. तेथे त्याने काही सोन्याचे नाणे गजानन सहाने यांना दाखवले.दोन टिकलीसारखे अंदाजे प्रतेकी एक ग्रॅमचे दोन नाणे त्याने गजानन सहाने यांना दिले व म्हणाला की हे नाणे सोन्याचे आहे की नाही हे चेक करुन घ्या.
त्यानंतर गजानन सहाने यांनी ते दोन सोन्याचे नाणे घेवून घरी आले. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तिने गजानन सहाने यांना अनेकवेळा फोन करुन विचारले की तुम्ही सोण्याचे नाणे घेण्यासाठी कधी येता? सद्या माझ्याकडे एवढे पैसे नाही, मी पैसे बघतो व तुम्हाला कळवतो असे गजानन सहाने त्या व्यक्तिला म्हणाले. व त्याच दिवशी गजानन सहाने हे भोकरदन येथील जैन ज्वेलर्स यांच्याकडे वरील दोन नाणे हे खरे आहे किंवा खोटे हे तपासले असता सदरचे नाणे हे खरे असल्याचे ज्वेलर्सकडून कळाले.
त्यानंतर गजानन सहाने यांनी दि 17/05/2023 रोजी सदर व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर फोन करून सांगितले की मी पैसे जमा केले आहे. तेव्हा त्या व्यक्तिने सिंदखेड राजा येथे गजानन सहाने यांना बोलावले. दिनांक 18/5/2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गजानन सहाने हे सिंदखेडराजा येथे पोहोचले. त्याने देऊळगाव राजा रोडवर बोलावले. तेव्हा गजानन सहाने हे त्यास भेटले आसता दोघांमध्ये सदरचे सोने घेण्याबाबत पाच ते दहा मिनीटं संभाषण झालं. तेव्हा त्याने गजानन सहाने यांना विचारले की तुम्ही पैसे सोबत आणले आहे का. तुम्ही आमच्या सोबत भोकरदनला चला मी तुम्हाला येथे पैसे देतो, असे गजानन सहाने हे त्या व्यक्तिला म्हणाले.
नंतर साडे चार वाजेच्या सुमारास गजानन सहाने हे भोकरदन येथे पोहचल्यावर नांजा पाटीवर थाबले असता तो व्यक्तीही पाठीमागून मोटारसायकलने तेथे पोहोचला. गजानन सहाने यांनी त्या व्यक्तीला 9,00,000/- रुपये (नऊ लाख रुपये) दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने एका पन्नीमध्ये आसलेले सोण्याचे नाणे गजानन सहाने यांना दिले आणि म्हणाला हे सोन्याचे नाणे ज्याचे आहे ते पाहुणे माझ्या सोबत आलेले आहे. ते मागील फाट्याजवळ थांबलेले आहे. तुम्ही हे सोन्याचे नाणे तुमच्याजवळ ठेवा मी हे पैसे पाहुण्याना देवून येतो. मी आल्यानंतर आपण सोनाराच्या दुकानात जावून सदरचे सोण्याचे नाणे मोडून घेवू असे म्हणून तो अनोळखी व्यक्ती तेथून निघून गेला.
त्यानंतर बराच काळ वाट बघूनही तो व्यक्ती तेथे आला नाही. मोबाईलही त्याने स्वीच ऑफ करून ठेवला. यामुळे फसवणूक झाल्याचे गजानन सहाने यांच्या लक्षात आले. त्यानंतर गजानन सहाने यांनी त्या सोण्याची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून तपासाची सूत्रे फिरवली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe