महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या जिल्हा न्यायाधीशांचे घर फोडले ! पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – जिल्हा न्यायाधीशांचे किरायाचे घर फोडून चोरट्यांनी 1,77,900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. कोर्टाला सुट्टी असल्याने न्यायाधीश या नाशिक येथे गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डाव साधला. चोरीची ही घटना नंदनवन कॉलनी, नरेश कम्पलेक्स मागे जालना येथे घडली.

जिल्हा न्यायाधीश वसुधा भोसले यांच्या किरायाच्या घरी ही चोरी झाली. त्यांचे पती लक्ष्मीकांत किसनराव भोसले (वय 60 वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. काचनरत्न बंगल हनुमान नगर सायखेडा रोड जेलरोड नाशिक रोड, ह. मु नंदनवन कॉलनी, शिंदे यांचा बंगला, नरेश कम्पलेक्स मागे जालना) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, ते नाशिक येथे राहात असून एक वर्षापासून त्यांचे कुटुंब जालन्यातील नंदनवन कॉलनीत किरायाने राहतात.

त्यांची पत्नी वसुधा भोसले या जिल्हा न्यायालय जालना येथे जिल्हा न्यायधीश म्हणून नौकरीस आहे. दिनांक 21/05/2023 रोजी कोर्टाला सुट्टी व सुट्टीवर असल्यामुळे सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास जालन्यातील घराला कुलूप लाऊन जनशताब्दीने जिल्हा न्यायाधीश व मुलगी नाशिक येथे गेल्या होत्या.

दि.22/05/2023 रोजी रात्री 03:00 वाजेच्या सुमारास नाशिक येथे असताना त्यांना फोन आला व सांगितले की, तुमच्या घराच्या दरवाज्याला लावलेला कुलुप व कडी कोंडा तुटलेला दिसत आहे. ही माहिती मिळताच लक्ष्मीकांत किसनराव भोसले हे सकाळी 08:30 वाजेच्या सुमारास जालन्यातील नंदनवन कॉलनीत किरायाचे घरी पोहोचले. तेव्हा त्यांना घराच्या दरवाज्याला लावलेले कुलुप कडीकोंडा तुटलेले दिसले.

घरामध्ये जावुन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत होते. तसेच घरामधील मा. उच्च न्यायालयाने सरकारी कामाकरीता वापरण्यासाठी दिलेला 1 अँपल कंपनीचा सरकारी टॅब व मुलीची शाळेची बॅग व बॅगमध्ये ठेवलेला 1डेल कंपनीचा लॅपटॉप आदी चोरीस गेले. आज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलुप व कडी कोंडा तोडून चोरी केली. लक्ष्मीकांत भोसले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!