छत्रपती संभाजीनगर
Trending

मानेला पकडून जमीनीवर आपटले, छातीवर बुक्क्याने मारहाणीत मृत्यू ! खूनी हल्ल्याने झांबड ईस्टेट श्रेयनगर उस्मानपुरा हादरले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- मोबाईल फोनवरून झालेल्या खूनी हल्ल्ल्याने छत्रपती संभाजीनगर हादरले. मानेला पकडून जमीनीवर आपटले, छातीवर बुक्क्याने मारहाण केली. यात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घटना 24/10/2023 रोजी 13:00 ते 22/11/2023 रोजी 12.30 वाजेदरम्यान झांबड ईस्टेट, श्रेयनगर, उस्मानपुरा परिसरात घडली.

भावेश ब्रम्हेचा (रा. कावेरी आपार्टमेंट, श्रेयनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक रामेश्वर रॉय, (वय ४८ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. श्रेयनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24/10/2023 रोजी 13:00 ते 22/11/2023 रोजी 12.30 वाजेदरम्यान झांबड ईस्टेट, श्रेयनगर, उस्मानपुरा येथे यातील फिर्यादीच्या मुलास यातील आरोपी भावेश ब्रम्हेचा म्हणाला की, “दस-याच्या एक दिवस अगोदर तू माझा फोन फेकला होता.

त्यामुळे त्या मोबाईलचे नुकसान झाले आहे. त्याचे तू मला पैसे दे.” असे म्हणाल्याने यातील फिर्यादीचा मुलगा हा बोलला की, “”मी नतंर देतो. ” असे बोलल्याने यातील आरोपी भावेश ब्रम्हेचा याने फिर्यादीच्या मुलाच्या मानेला पकडून जमीनीवर आपटले. छातीवर बुक्क्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. भावेश ब्रम्हेचा हा फिर्यादीच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी मृत मुलाचे वडील अभिषेक रामेश्वर रॉय, (वय ४८ वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. श्रेयनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनर भावेश ब्रम्हेचा याच्यावर उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं 213/2023 कलम 304 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनि पाटील करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!