छत्रपती संभाजीनगर
Trending

क्रीडा शिक्षकाला अडीच लाखांची खंडणी मागितली, क्रीडा अधिकाऱ्याकडे खोटी तक्रार करण्याची धमकी, दोघांवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- क्रीडा अधिकाऱ्याकडे खोटी तक्रार करण्याची धमकी दिल्याचा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर क्रीडा शिक्षकाला अडीच लाखांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

21/11/2023 रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नक्षत्रवाडी मातोश्री हॉटेलमध्ये हा प्रकार झाला. अर्जुन उत्तम पवार (रा. गिरनेरा तांडा, छत्रपती संभाजीनगर), योगेश नामदेव जाधव (रा. माहोळा, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी क्रीडा शिक्षक महेश कृष्णा इंदापुरे (रा. ईटखेडा, पैठण रोड) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 21/11/2023 रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नक्षत्रवाडी मातोश्री हॉटेलमध्ये आरोपी अर्जुन उत्तम पवार (रा. गिरनेरा तांडा, छत्रपती संभाजीनगर), योगेश नामदेव जाधव (रा. माहोळा, छत्रपती संभाजीनगर) यांनी संगनमत करून फिर्यादी क्रीडा शिक्षक महेश कृष्णा इंदापुरे यांना म्हणाले की, आम्ही तुझ्या विरुध्द क्रीडा अधिका-याकडे खोटी तक्रार करु अशी धमकी देऊन फिर्यादी कडून अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली.

याप्रकरणी क्रीडा शिक्षक महेश कृष्णा इंदापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन उत्तम पवार (रा. गिरनेरा तांडा, छत्रपती संभाजीनगर), योगेश नामदेव जाधव (रा. माहोळा, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये 396/2023 कलम 384, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सफौ गवांदे करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!