महाराष्ट्र
Trending

ग्रामसेवक गंगाकिशन ऐन्लोडने लाच मागितली ! नमुना नंबर ८ वर नोंद घेण्यासाठी तडजोडीअंती ५ हजारांची डिमांड !!

नांदेड, दि. २५ – नुमना नंबर ८ अ वर घराची नोंद घेण्यासाठी सुरुवातीला १५ हजार व तडजोडीअंती ५ हजार लाचेची मागणी केल्याने ग्रामसेवकावर भोकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाकिशन विठ्ठलराव ऐन्लोड (वय ४४ वर्षे, व्यवसाय नौकरी, पद ग्रामसेवक वर्ग-३, ग्रामपंचायत कार्यालय रिठ्ठा ता. भोकर जि. नांदेड, रा. बालाजी अपार्टमेंट, फरांदे पार्क, वाडी बु. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.

तकारदार यांना वारसा हक्काने वडीलोपार्जीत मिळालेल्या घराची नमुना नं. ८ अ ला तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी घराची कागदपत्रे पूर्ण करून ती फाईल ग्रामपंचायत कार्यालय रिठ्ठा येथे दाखल केली होती. तक्रारदार यांचे घराची नमुना नं. ८ ला नोंद घेण्यासाठी आरोपी गंगाकिशन ऐन्लोड यांनी तक्रारदार यांचेकडून १५,०००/- रू. लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती ५,०००/- रू. घेण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड चे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक यांच्या पर्यवेक्षणात श्रीमती स्वप्नाली धुतराज पोलीस निरीक्षक, राहुल पखाले पोलीस निरीक्षक, मपोहेकॉ मेनका पवार, पोकॉ ईश्वर जाधव, पोकॉ अरशद खान, पोकॉ रितेश कुलथे, पोकॉ यशवंत दाबनवाड, चापोहेकॉ मारोती सोनटक्के, चापोहेकॉ गजानन राउत (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!