महाराष्ट्र
Trending

शिक्षकांच्या बंदल्यासंदर्भातील तक्रारीवर आता वेगाने निपटारा होणार ! कामाच्या व्यापामुळे विभागीय आयुक्त उपायुक्तांकडे अंतिम निर्णयासाठी प्राधिकृत करू शकणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – विभागीय स्तरावरील कामकाजाचा आवाका विचारात घेता, प्रशासकीय कारणास्तव शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबतच्या तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना किंवा विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केल्यास संबंधित उपायुक्त (आस्थापना) यांना राहतील, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबतच्या तक्रारीवर वेगाने निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.

दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील मुद्दा क्र. १९ व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भातील शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील मुद्दा क्र. ५.१० बदल्यांबाबतच्या अनियमिततेची तक्रार यासाठी संबंधित विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील, अशी तरतूद आहे.

तथापि, विभागीय स्तरावरील कामकाजाचा आवाका विचारात घेता, प्रशासकीय कारणास्तव शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबतच्या तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना किंवा विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केल्यास संबंधित उपायुक्त (आस्थापना) यांना राहतील. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव प्रशांत पाटील यांनी आजच, ९ फेब्रुवारी रोजी हा आदेश राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्या नावाने जारी केला आहे.

हा शासन निर्णयाची प्रत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आली असून त्यांनी ती सर्व शिक्षकांच्या तसेच संघटनांच्या निदर्शनास आणून देण्याचे नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!