छत्रपती संभाजीनगर
Trending

गुटखा मागितला, ढकलून दिले ! थोड्यावेळाने तो पुन्हा आला अन् ब्लेडने गळ्यावर वार करून पळून गेला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – गल्लीतल्या मुलाला गुटखा मागितला म्हणून त्याने ढकलून दिले. यानेही तोंडात मारले. वडिलांनी भांडण सोडवले मात्र थोड्यावेळाने तो पुन्हा आला अन् गळ्यावर ब्लेडने वार करून पळून गेला.

ही घटना देवगिरी कंपनीच्या बाजुला मिसारवाडी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. गणेश अंकुश मकळे (वय 20 वर्षे, रा- कादरीया कॉलनी गनं 8, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.

गणेश अंकुश मकळे याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्याच्या घराजवळ राहणार्या मुलाशी किरकोळ भांडण झाले होते. दि-25/06/2023 रोजी दुपारी 03.00 वाजेच्या सुमारास देवगिरी कंपनीच्या बाजुला मिसारवाडी छत्रपती संभाजीनगर येथे असताना गणेश अंकुश मकळे यास तो मुलगा भेटला.

त्यावेळी गणेश अंकुश मकळे हा त्यास म्हणालो की मला गुटख्याची पुडी दे. त्यावेळी त्याने गणेश अंकुश मकळे यास ढकलून दिले. त्यामुळे गणेश अंकुश मकळे याने त्याच्या तोंडात मारले. त्यानंतर त्या मुलाचे वडील रफिक शहा तेथे आले व त्यांनी भांडण सोडवले. थोड्यावेळाने तो मुलगा आणि आधीच्या भांडणाच्या कारनावरून त्याने गणेश अंकुश मकळे याच्यावर  ब्लेडने हल्ला चढवला.

गळ्यावर ब्लेडने मारले. जखमी गणेश अंकुश मकळेने कसे बसे पोलीस ठाणे सिडको गाठले व त्यानंतर उपाचरकामी घाटी दवाखाना. दरम्यान, याप्रकरणी गणेश अंकुश मकळे यांने दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!